Mumbai : ट्रॉमा केअरमध्ये दोन दिवस मृतदेह पडून; बीएमसी प्रशासन झोपेत, सुरक्षा व्यवस्थेचा फज्जा

Mumbai News : बीएमसीच्या ट्रामा केअर सेंटरमध्ये अशा पद्धतीने निष्काळजीपणा उघड झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. अर्थात ट्राम केअर सेंटरमध्ये दोन दिवस मृतदेह पडून राहिला आहे
Mumbai News
Mumbai NewsSaam tv
Published On

संजय गडदे
नवी मुंबई
: जोगेश्वरी पूर्वेकडील महानगरपालिकेच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दोन दिवस मृतदेह पडून असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन दिवसांनंतर हा प्रकार उजेडात आल्याने प्रशासन अनभिज्ञ राहणे ही केवळ धक्कादायक नव्हे तर संतापजनक घटना आहे. मुळात बीएमसीच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचा विश्वास डळमळीत झाला आहे. रुग्णसेवा तर सोडाच, पण दोन दिवस मृतदेह पडून असतानाही प्रशासनाला याची खबर न लागणे ही गंभीर व धक्कादायक बाब आहे. 

मुंबईसारख्या महानगरात जेथे हजारो रुग्ण दररोज उपचारासाठी धडपड करत आहेत. तिथे इतकी निष्काळजीपणा दिसून आल्याने जनतेच्या मनात तीव्र संताप आहे. एका बाजूला रुग्णालयात बेड मिळत नाहीत, औषधोपचारात कमतरता जाणवते आणि दुसऱ्या बाजूला प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे नागरिकांचा जीव धोक्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मंगळवारी सापडलेल्या या मृतदेहामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. 

Mumbai News
OBC Reservation: 'आमचं मोठं नुकसान झालं', OBC आरक्षणासाठी २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या; शेतात जाऊन संपवलं आयुष्य

२० सप्टेंबरला मृत सीसीटीव्ही कैद 

महापालिकेच्या ट्राम केअर सेंटर रुग्णालयाच्या सीसीटीव्हीमध्ये मृत व्यक्ती २० सप्टेंबर रोजी मोर्चरीच्या मागच्या भागात जाताना दिसतो. त्यानंतर तो मृत अवस्थेत सापडतो, अर्थात मंगळवारी सापडलेला मृतदेह प्रत्यक्षात २० सप्टेंबरच्या रात्रीचाच असून दोन दिवस कोणी लक्ष दिले नाही. इतक्या मोठ्या रुग्णालयात सुरक्षा आणि देखरेखीची एवढी बेपर्वाई कशी काय चालते; असा सवाल नागरिक विचारत आहेत.

Mumbai News
Kopargaon Crime : कोपरगाव शहरात दोन गटात राडा; रात्रीच्या सुमारास दगडफेक व हाणामारी, ६३ जणांवर गुन्हा दाखल

दोन दिवस प्रशासन अनभिज्ञ 
रुग्णालय प्रशासन व सुरक्षा कर्मचारी दोन दिवस पूर्णपणे अनभिज्ञ राहिले. ही गोष्ट ट्रॉमा केअर सारख्या संवेदनशील सेवेत उघड झालेली मोठी बेपर्वाई आहे. हा प्रकार केवळ मृत व्यक्तीचा अपमान नसून, संपूर्ण रुग्णालय व्यवस्थेच्या उदासीनतेचे उदाहरण आहे. यावर तातडीने कारवाई न झाल्यास नागरिकांचा विश्वास कोलमडणार हे नक्की.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com