OBC Reservation: 'आमचं मोठं नुकसान झालं', OBC आरक्षणासाठी २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या; शेतात जाऊन संपवलं आयुष्य

Parbhani News: ओबीसी आरक्षणासाठी २२ वर्षीय तरुणाने परभणीमध्ये आत्महत्या केली. 'आमच्या हातातून आरक्षण गेलं. त्यामुळे आमचं मोठं नुकसान झालं.', असे म्हणत या तरुणाने गळफास घेत आयुष्य संपवलं.
OBC Reservation: 'आमचं मोठं नुकसान झालं', OBC आरक्षणासाठी २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या; शेतात जाऊन संपवलं आयुष्य
OBC ReservationSaam Tv
Published On

Summary -

  • परभणीच्या जिंतूर तालुक्यात २२ वर्षीय कुमार आघावी या तरुणाने आत्महत्या केली.

  • ओबीसी आरक्षण गमावल्याने मानसिक तणावात आल्याचे सुसाईड नोटमध्ये लिहिले.

  • आमचं मोठं नुकसान झालं असं सुसाइड नोटमध्ये लिहिलं.

  • एकुलता एक मुलगा गमावल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

ओबीसी आरक्षणासाठी एका २२ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीमध्ये घडली. 'ओबीसी आरक्षण गेलं, माझी मनस्थिती बरोबर राहिली नाही.', असं म्हणत या तरुणाने शेतामध्ये जाऊन आयुष्य संपवलं. शेतामधील लिंबाच्या झाडाला गळफास घेत या तरुणाने आत्महत्या केली. ही घटना परभणीच्या जिंतूर तालुक्यात घडली. चार बहिणींचा एकुलता एक भाऊ असलेल्या या तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

OBC Reservation: 'आमचं मोठं नुकसान झालं', OBC आरक्षणासाठी २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या; शेतात जाऊन संपवलं आयुष्य
OBC Reservation: आरक्षण गेल्यावर मुलाला नोकरी कशी मिळणार?, ओबीसी आरक्षण बचावासाठी आणखी एकाची आत्महत्या

'ओबीसी आरक्षण गेलं असं मी समाजापासून ऐकत आलो होतो. त्यामुळे माझी मनस्थिती बरोबर राहिली नव्हती. माझ्या डोक्यात सतत तोच विचार चालू होता. आमच्या तरुण बांधवांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मी माझ्या ओबीसी समाजासाठी माझे जीवन संपवून टाकतो.' अशी सुसाइड नोट लिहित या तरुणाने आत्महत्या केली. एकुलता एक मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला.

OBC Reservation: 'आमचं मोठं नुकसान झालं', OBC आरक्षणासाठी २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या; शेतात जाऊन संपवलं आयुष्य
OBC Reservation : मी लग्नासाठी तयार, आता लक्ष्मण हाके यांनी मुलगी द्यावी; मुंडावळ्या बांधलेल्या रमेश पाटलांचा व्हिडिओ व्हायरल

कुमार नारायण आघाव असं आत्महत्या केलेल्या २२ वर्षीय तरुणाचे नाव होते. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील आडगाव दराडे येथे तो आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होता. या तरुणाने शेतात जात लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. यावेळी त्याच्याजवळ एक सुसाइड नोट सापडली असून त्यामध्ये ओबीसी आरक्षण गेल्यामुळे तो तणावात होता. सतत त्याच्या डोक्यात तोच विचार सुरू होता आणि आमच्या तरुणांचे मोठे नुकसान झाले असल्याचे लिहिले होते.

OBC Reservation: 'आमचं मोठं नुकसान झालं', OBC आरक्षणासाठी २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या; शेतात जाऊन संपवलं आयुष्य
OBC Reservation: ''आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळ यांचा शरद पवारांना सवाल

या प्रकरणी जिंतूरच्या बोरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस सध्या तपास करत आहेत. कुमार आघाव हा त्यांच्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याला ४ बहिणी आहेत. त्याच्या मृत्यूमुळे आघाव कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्याच्या कुटुंबियाना सरकारने आर्थिक मदत करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

OBC Reservation: 'आमचं मोठं नुकसान झालं', OBC आरक्षणासाठी २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या; शेतात जाऊन संपवलं आयुष्य
OBC Vs Maratha: लक्ष्मण हाकेंना मारण्यासाठी 11 जणांची टीम, मराठा नेते आक्रमक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com