सांगली : सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण क्षेत्रामध्ये पावसाची संततधार कायम (sangli News) आहे. गेल्या २४ तासांमध्ये या ठिकाणी पुन्हा अतिवृष्टी झाली आहे. यामुळे चांदोली धरण (Chandoli Dam) ८५ टक्के भरले आहे. (Tajya Batmya)
सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण क्षेत्रामध्ये ५५ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. संततधार पडणाऱ्या पावसामुळे चांदोली धरण आता जवळपास ८५ टक्के इतके भरले आहे. यामुळे धरणामध्ये पाण्याची आवक ही कायम आहे. ३४.४० टीएमसी इतकी साठवण क्षमता असणाऱ्या धरणामध्ये आता २९ टीएमसी इतका (Heavy Rain) पाणीसाठा निर्माण झाला आहे.
नदीतील विसर्ग वाढला
धरणातील पाणीसाठा वाढल्यामुळे धरण प्रशासनाकडून धरणातून वारणा नदी पात्रामध्ये कालपासून विसर्ग सुरू करण्यात आला होता. तो विसर्ग आता वाढवून ६ हजार ७८० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये आणखी वाढ होणारा असून धरण प्रशासनाकडून वारणा नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.