Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Heavy Rain : नोव्हेंबरमध्ये अतिवृष्टी, पुलावरून पाणी, वाहतूक ठप्प; सांगलीतील वाळव्यासह परिसराला झोडपून काढले

Sangli News : दहा दिवसांपूर्वीच परतीच्या पावसाने राज्यातील अनेक भागात हाहाकार माजविला होता

विजय पाटील

सांगली : सांगलीच्या वाळवा तालुक्यामध्ये पहाटेच्या सुमारास अतिवृष्टी झाली आहे. धुव्वाधार पाऊस झाल्यामुळे परिसरामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ऐन दिवाळीच्या दिवशी जोरदार पाऊस आल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. तर शेतातील कापूस देखील खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यात काही भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. दरम्यान दहा दिवसांपूर्वीच परतीच्या पावसाने (Heavy Rain) राज्यातील अनेक भागात हाहाकार माजविला होता. या पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. काही दिवस पाऊस गेल्यानंतर आज पुन्हा सांगलीच्या वाळवा परिसरात जोरदार पाऊस झाला. (Sangli) वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार अशा पावसामुळे वाळवा परिसरातील ओढ्या-नाल्यांना पूर स्थिती निर्माण झाली आहे. 

सकाळी आलेल्या पावसामुळे आष्टा- वाळवा रस्त्यावरील छोटा पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक सकाळपासून बंद होती. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तर सांगली जिल्ह्याच्या अनेक भागात देखील रात्री आणि पहाटेच्या सुमारास मुसळधार असा पाऊस पडला आहे. ऐन दिवाळीच्या दिवशी जोरदार पाऊस आल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कणकवलीत नितेश राणे पुन्हा मारणार बाजी? पाहा Exit Poll

Exit Poll Maharashtra : बीडमध्ये शरद पवार की अजित पवार? कोणाचा उमेदवार मारणार बाजी? पाहा VIDEO

Bigg Boss 18: 'मेरी मर्जी...' म्हणत विवियन अन् अविनाशने घरात घातला धुमाकूळ, 'टाइम गॉड' दिग्विजयच्या तोंडचे पाणी पळाले

Sangli News : शाळगाव एमआयडीसीत कंपनीमध्ये वायू गळती; दोन महिलांचा मृत्यू

Maharashtra Exit Poll: दिंडोरीमधून अजित पवार गटाचे नरहरी झिरवाळ होणार आमदार? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT