Sangli News Guardian Minister Suresh Khade Saam TV
महाराष्ट्र

Sangli News : पालकमंत्र्यांच्या कार्यालयात गुन्हेगारांचा वावर; मंत्री पुत्राची भेट घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल

Sangli breaking News: राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयात गुन्हेगारांचा वावर असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

विजय पाटील

राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयात गुन्हेगारांचा वावर असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हत्येचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपींनी मंत्री खाडे यांच्या मुलाची भेट घेत विचारपूस केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे नागरिक चांगलेच संतापले आहेत.

सुरेश खाडे यांच्या कार्यालयाला भेट देणारा व्यक्ती हा मिरज शहराला हादरून टाकणाऱ्या सलीम भिलवडे खून प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. सोहेल नदाफ असं त्याचं नाव आहे. सध्या तो जामिनावर बाहेर आला असून त्याच्या टोळीकडून मिरज शहरात सध्या दहशत निर्माण करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर त्याने मंत्री पुत्र सुशांत खाडे याची थेट त्यांच्याच संपर्क कार्यालयात जाऊन भेट घेतल्याने मिरज शहरात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सांगलीत गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. मिरज शहरातले कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाले आहेत.

पुण्यापाठोपाठ मिरज शहरात कोयता गँगची मोठी दहशत निर्माण झाली आहे.दोनवेळा कोयता गँगच्या गुंडांनी मिरज शहरातील सुमारे 35 ते 40 वाहनांची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याचबरोबर खून, मारामाऱ्या, अशा घटना वारंवार घडत आहे.

गुन्हेगार तसेच गावगुंडांना कायद्याचा धाक उरला नाही का? असा प्रश्न परिसरातील नागरिक उपस्थित करीत आहेत. त्यातच पालकमंत्री असणाऱ्या सुरेश खाडे यांच्याच कार्यालयामध्ये गुंडांचा वावर वाढला आहेत. खाडे यांच्या मुलासोबत आरोपींनी घेतलेल्या भेटीगाठीमुळे पालकमंत्र्यांचे गुन्हेगारांना अभय तर नाही ना? अशा उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra IAS Transfer : ऐन निवडणुकीच्या हंगामात 7 बड्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

Lizard Facts: पाल सलग पळताना का दिसत नाही? थांबत थांबत का पळते?

Love Rashifal: पाच राशींच्या आयुष्यात प्रेमाचा वर्षाव; बायकोशी वाद की रोमांस, जाणून घ्या विवाहितांसाठी कसा असेल दिवस?

Maharashtra Infrastructure: मोदी सरकारचं महाराष्ट्राला मोठं गिफ्ट! दोन रेल्वे मार्गांना मंजुरी; कोणाला होणार फायदा?

Mumbai Gold मेट्रो लाईन: मुंबईहून ४० मिनिटात गाठता येणार नवी मुंबई विमानतळ

SCROLL FOR NEXT