Bogas Seeds Seized : छत्रपती संभाजीनगर आणि लातूरमध्ये कृषी विभागाच्या धाडी; बनावट खतांसह बोगस बियाण्यांचा साठा जप्त

Bogus Seeds News : कृषी विभागाच्या पथकाने छत्रपती संभाजीनगर आणि लातूर जिल्ह्यातील अनेक कृषी दुकानांवर अचानक धाडी टाकल्या. यावेळी बियाणे तसेच खतांचा मोठा साठा जप्त करण्यात आला.
 बनावट खतांसह बोगस बियाण्यांचा साठा जप्त
Bogas Seeds Seized Saam TV

पेरणीचा हंगाम सुरू होताच काही ठिकाणी बोगस बियाणे तसेच खतांची विक्री होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या तक्रारींची कृषी विभागाने गंभीर दखल घेतली आहे. सोमवारी (ता १०) कृषी विभागाच्या पथकाने छत्रपती संभाजीनगर आणि लातूर जिल्ह्यातील अनेक कृषी दुकानांवर अचानक धाडी टाकल्या. यावेळी बियाणे तसेच खतांचा मोठा साठा जप्त करण्यात आला.

 बनावट खतांसह बोगस बियाण्यांचा साठा जप्त
Maharashtra Rain Alert : मान्सूनने व्यापला निम्मा महाराष्ट्र; आज 'या' भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता

या कारवाईमुळे बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणादणले आहेत. पेरणीच्या तोंडावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बोगस बियाण्यांची विक्री होत असल्याचा तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत कृषी विभागाच्या पथकाने फुलंब्री, पैठण आणि करमाडमधील दुकानांवर धाडी टाकल्या.

यावेळी व्यापारी चढ्या दराने बियाणे विक्री करत असल्याचे आढळून आले. तसेच काही ठिकाणी बोगस बियाण्यांची विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी जिल्हा कृषी विभागाने एकून ८ दुकाने सील केली आहेत. आठवडाभरापूर्वीच पाचोड आणि गंगापूर मध्ये कृषी विभागाने आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत लाखो रुपयांची बोगस बियाणांची पाकिटे जप्त केली होती.

लातूरमध्ये बनावट खतांचा मोठा साठा जप्त

लातूर जिल्ह्यातल्या चाकुर आणि सारोळा इथल्या माऊली कृषी सेवा केंद्र आणि जाधव कृषी सेवा केंद्रावर कृषी विभागाच्या पथकाने सोमवारी छापा टाकला. यावेळी भेसळयुक्त बनावट खतांचा मोठा साठा आढळून आला. कृषी विभागाने हा साठा तत्काळ जप्त केला. तसेच दोन्ही कृषी सेवा चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा बनावट खतांचा साठा नेमका कुठून आला याचा तपास कृषी विभागाचे अधिकारी करीत आहेत. शेतकऱ्यांनी बियाणे तसेच खतांची खरेदी करण्यापूर्वी दक्षता घ्यावी, तसेच दुकानदारांकडून रीतसर पावती घेणे गरजेचं आहे, असं आव्हान देखील कृषी विभागाने केले आहे.

 बनावट खतांसह बोगस बियाण्यांचा साठा जप्त
Maharashtra Rain Update: राज्यात सगल दुसऱ्या दिवशीही धुव्वाधार पाऊस; ओढ्यांना पूर, पूल वाहून गेल्याने जनजीवन विस्कळीत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com