Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Sangli News: फॉरेन रिटर्न लेकीने घेतला कारभार हाती; लोकांमध्‍ये जावून जाणल्‍या सरपंच तरुणीने समस्या

फॉरेन रिटर्न सरपंच; पदावर विराजमान होताच तरुणीचा धडक कारभार सुरू

विजय पाटील

सांगली : परदेशातील उच्च शिक्षण सोडून सरपंच पदाच्या निवडणुकीत उतरले आणि सगळ्यांना चारी मुंड्या चित करत सरपंच पदी विजयी देखील झाली. आता थेट सरपंच पदावर विराजमान होत गावाच्या विकासाचा कारभार सुरू केला आहे. विशेष म्हणजे कोणताही गाजावाजा न करता मिरजेच्या वड्डी येथील यशोधरा राजे शिंदे या सरपंच तरुणींने थेट लोकांच्या समस्या सोडवण्यास सुरुवात केली आहे. (Letest Marathi News)

सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या वड्डी ग्रामपंचायतच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. कारण ही तसं होतं, या ठिकाणी सरपंच पदाच्या निवडणुकीत उभी राहिलेली तरुणी ही थेट परदेशातून आली होती. जॉर्जिया या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण घेणारी यशोधरा राजेश शिंदे हे गावच्या विकासासाठी आणि घरच्यांच्या आग्रहा खातर आपल्या शेवटच्या वर्षाचे शिक्षण अर्धवट सोडून सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये उभी राहिली होती.

पॅनलही केले उभे

आपल्या पॅनल देखील तिने उभं केलं होतं आणि सत्ताधाऱ्यांना धूळ चारत यशोधरा राजे शिंदे हे निवडून तर आली. शिवाय आपले अख्खे पॅनल देखील निवडून आणले. आता गावच्या विकासासाठी यशोधरा राजे ही सज्ज झाली आहे.

गाजावाजा नाहीच

सगळीकडे सरपंच पदाचा कार्यभार मोठ्या दिमाखात पार पडत असताना यशोधरा राजे शिंदे यांनी मात्र कोणताही गाजावाजा न करता साध्या पद्धतीने थेट सरपंच पदाचा कारभार हातात घेतला आहे. इतकच नव्हे तर सरपंच पदाच्या खुर्चीवर विराजमान होताच यशोधरा राजे यांनी जनतेच्या विकासाच्या दृष्टीने कामकाज सुरू केले आहे. त्यांच्या समस्या आणि निराकरण करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देखील देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गावचा शंभर टक्के विकास होणार अशी चर्चा गावात सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : ...तर शिंदेंना एकही पालिका जिंकून देणार नाही, नाईकांचं उपमुख्यमंत्र्यांना चॅलेंज

Girls Care Tips: प्रत्येक मुलीला माहित असल्या पाहिजेत या ७ हाइजीन टिप्स

Shocking : आजारपणाला वैतागला, ३० वर्षाच्या तरूणाची आत्महत्या; भंडाऱ्यात हळहळ

Maharashtra Live News Update : मुलुंड मेट्रो पूल अपघात प्रकरण, आरोपींना आज भोईवाडा कोर्टात हजर करणार

Tejas Thackeray: तेजस ठाकरेंची प्रकृती बिघडली, रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू

SCROLL FOR NEXT