धुळे : तृतीयपंथीयांचा समाजातील मानाचा स्तर उंचावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तृतीय पंथीयांसाठी सन्मानाने शासकीय सेवेत स्थान देण्याचा निर्णय दिला आहे. यानंतर (Police) पोलिस दलात तब्बल ११६ वर्षात प्रथमच चाँद उर्फ बेबो पार्वती जोगीच्या रुपाने तृतीय पंथियाने पोलिस भरतीसाठी आव्हान दिले आहे. (Breaking Marathi News)
पोलीस भरतीत देखील आता तृतीयपंथीयांचा सहभाग असल्याचे दिसून येत आहे. खाकीमध्ये देखील आता तृतीयपंथी बंदोबस्ता दरम्यान इतर पोलीस बांधवांप्रमाणे दिसून येणार असल्यामुळे आता तृतीयपंथीयांकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा नक्कीच बदलेल. धुळ्यात (Dhule News) 42 पदांच्या पोलीस भरती प्रक्रियेत चाँद उर्फ बेबो पार्वती जोगी यांनी पोलीस भरतीत सहभागी होण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.
वर्षभरापासून सराव
जळगाव (Jalgaon) जिल्हयातील रहिवाशी असलेल्या चाँद तडवी उर्फ बेबो पार्वती जोगीने धुळ्यातून अर्ज दाखल केला आहे. भुसावळ (Bhusawal) येथील तृतीयपंथी चाँद सरवर तडवी (वय 27) च्या रुपाने यंदाची भरती वेगळी ठरणार आहे. पोलिस भरतीसाठी सुमारे वर्षभरापासून चाँद तयारी करत होती. मैदानी सरावासोबत अभ्यासावरही चाँदने लक्ष केंद्रीत केले आहे. सराव व प्रचंड आत्मविश्वासाच्या जोरावर चांद पोलीस भरतीत उतरणार आहे. पोलिस झाली तर समाज सेवेलाच प्राधान्य राहील. शिवाय तृतीयपंथीयांचा सन्मान अधिक वाढवण्याचा मानस चाँदचा असणार आहे.
आदेशाची प्रतिक्षा
कागदपत्रकांची आज पुर्तता करण्यात आल्यानंतर तृतीयपंथीयांच्या भरती संदर्भात आगामी आदेश आल्यानंतर चाँदच्या उमेदवारीवर व चाचणी प्रक्रियेवर निर्णय घेण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी स्पष्ट केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.