Sangli News  Saam TV
महाराष्ट्र

Sangli News : कपडे धुण्यास गेलेल्या बाप-लेकाचा तलावात बुडून मृत्यू, कवठेमहांकाळमधील दुर्दैवी घटना

Father-Son Drown in lake : कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरा या घटनेची नोंद झाली आहे.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

Sangli News :

सांगलीच्या कवठेमहांकाळ येथून एक दु:खद बातमी समोर येत आहे. कपडे धुण्यास गेलेल्या बाप-लेकाचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे.

पाय घसरून बंडगरवाडी तलावात पडल्यामुळे राजेंद्र अण्णाप्पा चव्हाण (वय ४८) आणि कार्तिक राजेंद्र चव्हाण (वय १८) यांचा बुडून मृत्यू झाला आहे. मंगळवारी संधाकाळच्या सुमारास ही घटना घडली. कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरा या घटनेची नोंद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, करोली टी येथील राजेंद्र अण्णाप्पा चव्हाण आणि कार्तिक राजेंद्र चव्हाण हे घरातील धुणे धुण्यासाठी बंडगरवाडी तलाव परिसरात गेले होते. यावेळी ते पाय घसरुन पडले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. (Latest Marathi News)

सायंकाळी तलावाच्या लगत स्थानिकांना त्यांचे धुवायला आणलेले कपडे दिसले. यावरुन संशय आल्यानंतर पाहणी केली असता तलावात त्या दोघांचेही मृतदेह सापडले. तत्काळ स्थानिकांनी या दुर्घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर दोघांचेही मृतदेह बाहेर काढून रात्री १०च्या सुमारास त्यांचे मृतदेह हे शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आले होते. (Sangli News)

पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. दरम्यान, बाप-लेकांचा मृत्यू नेमका कसा झाला? याबाबत आता काही सांगता येत नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र बाप-लेकाच्या अचानक निधनाने संपूर्ण गावातून शोकाकूल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhajinagar News : संभाजीनगरात एमआयएम व ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

Maharashtra Exit Poll : विक्रोळी मतदारसंघात सुनील राऊत होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: मलकापूर विधानसभेत काँग्रेसचे राजेश एकाडे होणार आमदार? पाहा Exit Poll

Bhandara Crime : धक्कादायक.. अपशब्द बोलल्याने मालकाने केली कामगाराची हत्या; नदीत फेकला होता मृतदेह

Winter Wedding Tips: हिवाळ्यात लेहेंगा आणि साडीसह वापरा अशी जॅकेट आणि शाल ... ज्याने येईल ट्रेंडी लुक; थंडीपासूनही होईल बचाव

SCROLL FOR NEXT