Bribe Saam tv
महाराष्ट्र

पाच हजाराची लाच घेताना अव्वल कारकून सापळ्यात

पाच हजाराची लाच घेताना अव्वल कारकून सापळ्यात

विजय पाटील

सांगली : शेत जमिनीवर असलेला तबदिलीस मनाई हा शेरा कमी करण्यासाठी पाच हजाराची लाच घेताना भूसंपादन अव्वल कारकून चारुदत्त शंकरराव गावडे (वय 57) रंगेहाथ सापडला. लाचलुचपत प्रतिबंधकच्या सांगली (Sangli) विभागाने कारवाई केल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक सुजय घाटगे यांनी दिली. (sangli news collector office clerk caught taking bribe of five thousand rupees)

तक्रारदार व्यक्तीने आपल्या शेतजमीन क्षेत्रावर असलेल्या तबदिलीस मनाई हा शेरा कमी करुन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्र 6 यांच्या कार्यालयाकडे अर्ज केला होता. त्यांच्या अर्जानुसार कार्यवाही करण्यासाठी त्या कार्यालयातील अव्वल कारकून चारुदत्त गावडे याने पाच हजार रुपयांच्या लाचेची (Bribe) मागणी केली होती. याबाबत तक्रारदार व्यक्तीने १० मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार त्याच दिवशी लाचलुचपत प्रतिबंधकच्या कार्यप्रणालीप्रमाणे (ACB) पडताळणी केली. या पडताळणी गावडे याने तक्रारदार व्यक्तीच्या शेतजमीन क्षेत्रावर असलेल्या तबदिलीस मनाई हा शेरा कमी करुन देण्यासाठी पाच हजार रूपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते.

जिल्‍हाधिकारी कार्यालयातच रंगेहाथ

जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागाच्या कार्यालयातच गावडे हा लाचेची रक्कम स्विकारणार असल्याची माहिती मिळताच लाचलुचपत प्रतिबंधकने त्या ठिकाणी सापळा लावला. यावेळी गावडे हा लाचेची रक्कम स्विकारतांना रंगेहाथ जाळ्यात सापडला. या कारवाईनंतर चारूदत्त शंकरराव गावडे यांच्या विरुद्ध विश्रामबाग पोलीसांत लाचलुचपत प्रतिबंधक अधनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eyebrow Shaping Tips: घरच्या घरी करा परफेक्ट आयब्रो! पार्लरशिवाय सुंदर शेप मिळवण्यासाठी 2 सोप्या ट्रिक्स

Maharashtra Politics: शिंदेसेनेला मुंबईत फक्त 56 जागा? भाजपनं केली शिंदेसेनेची कोंडी?

Maharashtra Live News Update: कणकवली घोणसरीत मादी बिबट्याला केले जेरबंद

ठाकरेचं ठरलं, जागांवर अडलं? युतीच्या घोषणेला जागावाटपाचा अडसर?

Yerwada jail : धक्कादायक! येरवडा कारागृहात हाणामारी; कंबर आणि डोक्यात फरशी घातली, आरोपीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT