NCP
NCP saam tv
महाराष्ट्र

NCP News : 'राज्य सरकारने गुजरातची चाकरी करणे बंद करावे'; राष्ट्रवादीच्या आंदाेलनास प्रारंभ

विजय पाटील

NCP News : कोट्यावधी रुपयांचे प्रकल्प गुजरातला जात असल्याच्या निषेधार्थ सांगलीत राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून जोरदार आंदोलन करत राज्य सरकारच्या या कृतीचा निषेध करण्यात आला. राज्य सरकार गुजरात मध्ये जाणारे प्रकल्प रोखण्यास अपयशी ठरल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी केला. (Sangli Latest Marathi News)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या म्हणाल्या इतक्या मोठ्या प्रमाणात प्रकल्प हे महाराष्ट्रासाठी आवश्यक होते. राज्य सरकारने ते का थांबवले नाहीत ? असा सवाल ही उपस्थित केला आहे.

महाराष्ट्रात बेरोजगारी वाढत असताना गुजरातमध्ये जाणारे प्रकल्प हे महाराष्ट्रात राहिले असते तर बेरोजगारी कमी करण्यास मदत झाली असती. मात्र राज्य सरकार हे गुजरातची चाकरी करत असल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी केला आहे. (Maharashtra News)

दरम्यान राज्य सरकारच्या कृतीचा निषेध करत आज सांगलीतील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार आंदोलन करत मोठे प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्याच्या या संपूर्ण प्रकाराचा निषेध केला. महाराष्ट्र सरकारने (maharashtra government) महाराष्ट्रातील बेरोजगारी कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत आणि असे प्रकल्प हे महाराष्ट्रातच राहावे अशी मागणी यावेळी अनिता पाटील यांच्यासह राष्ट्रवादी (ncp) महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: अकोल्यात ट्रक आणि कारचा भीषण अपघात

Monsoon: खुशखबर! आज सायंकाळपर्यंत अंदमानमध्ये दाखल होणार मान्सून

Solapur News : दुष्काळामुळे सोलापूर जिल्ह्यातील साखर उद्योग अडचणीत; शेतकरीही चिंतेत 

AC Tips: उन्हाळ्यात ऐसी वापरताय? सेटिंग करताना 'या' चूका टाळा नाहितर...

SRH vs PBKS: हैदराबादविरुद्धच्या सामन्याआधी पंजाबने कर्णधार बदलला; या सामन्यासाठी अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११

SCROLL FOR NEXT