Sangali Murder News  Saam Tv
महाराष्ट्र

सोन्याची अंगठी मागितली म्हणून प्रियकरानं आवळला प्रेयसीचा गळा; सांगलीतील धक्कादायक घटना

ताई सचिन निकम (वय 32) असे हत्या झाले विवाहित महिलेचे नाव आहे.

विजय पाटील

सांगली : सोन्याची अंगठी मागितली म्हणून प्रियकराने प्रियसीचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. सांगली जिल्ह्यातील भिकवडी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. भिकवाडी येथील येरळा नदी पात्रात ६ जून रोजी एका 32 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणाचा अधिक तपास केल्यानंतर प्रियकराला अटक करण्यात आली आहे. (Sangali Latest Crime News)

ताई सचिन निकम (वय 32) असे हत्या झाले विवाहित महिलेचे नाव आहे. तर, सर्जेराव पवार (वय 31) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सराफ व्यवसाय करणाऱ्या राहुल सर्जेराव पवार याचे ताई सचिन निकम नावाच्या महिलेशी प्रेमसंबंध होते. ताई निकमचा मृतदेह भिकवडीतील येरळा नदीपात्रात ६ जून रोजी आढळून आला होता. तेव्हा ही आत्महत्या नसून खूनाचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यानंतर तपासात ताई निकम आणि राहुल पवार यांचे अनैतिक संबंध असल्याची माहिती समोर आली होती.

त्यानंतर, पोलिसांनी राहुल पवार याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, त्याने खुनाची कबूली दिली. मयत ताई निकम ही विटा येथे भाड्याच्या घरात राहत होती व येथील हॉटेलमध्ये भाकरी, चपाती करण्याचे काम करत होती. ताई आणि राहुल याचे सुमारे दीड वर्षापासून प्रेमसंबंध होते.

3 मे रोजी ताई निकम ही राहुलच्या दुकानात आली होती. तिने राहुलकडे तिच्या वाढदिवासाकरिता एक ग्रॅम सोन्याची अंगठी मागितली होती. मात्र राहुलने यास नकार दिला होता. अंगठी न दिल्याच्या कारणावरून तिने प्रेम संबंधाबाबत त्याच्या वडिलांना सांगेन असा दम दिल्याचे राहुलने सांगितले.

दरम्यान, राहुल आणि ताई निकम यांच्यात ५ मे रोजी विट्यात ढाणेवाडी परिसरात वाद झाला होता. दोघांमधला वाद इतका विकोपाला गेला की संशयित राहुल पवारने ओढणीने गळा आवळून ताई निकमचा खून केला. खून केल्यानंतर मृतदेह नदी पात्रात फेकल्याची कबुली राहुलने पोलिसांकडे दिली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashmika Mandanna: रश्मिका मंदाना सारखं ग्लॅमरस दिसायचं आहे? मग कारा 'या' फॅशन टिप्स फॉलो

Maharashtra Live News Update: बनावट ऑनलाईन अ‍ॅप प्रकरणात चौकशीत नसतानाही शेटे यांचे आत्महत्येचं पाऊल

Divya Deshmukh Chess World Cup : दिव्या देशमुख बनली वर्ल्ड चॅम्पियन! नागपूरच्या १९ वर्षीय लेकीनं घडवला इतिहास

Brain Exercises: मेंदूला तीक्ष्ण करण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी करा 'या' ब्रेन ॲक्टिव्हिटिज

Thane Traffic : घोडबंदर रस्त्यावर वाहतूक कोंडी वाढली; जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT