Hill Line Police Station
Hill Line Police StationSaam Tv

उल्हासनगर मध्ये पोलिसानेच केली महिलेची हत्या; मृतदेह घेऊन २४ तास फिरवत होता गाडीत

उल्हासनगर मधील खळबळजनक घटना
Published on

उल्हासनगर - मधील हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री एका महिलेची हत्या झाल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. एका धाब्यावर एका वेगेनार गाडीमध्ये महिलेचा मृतदेह पोलिसांना आढळला आहे. त्या प्रकरणात विठ्ठल वाडी पोलिसांनी (Police) सदर महिलेच्या हत्येप्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले आहे. यातील मुख्य आरोपी सचिन खाजेकर हा ठाणे पोलीस मुख्यालयात पोलीस नाईक पदावर कार्यरत आहे.

हे देखील पाहा -

मृत महिला औरंगाबाद येथील रहिवासी आहे. तिचे वय पन्नास वर्षे असून ती पोलीस नाईक सचिन खाजेकर यांच्याकडे कर्ज वसुलीसाठी आल्याचे बोलले जात आहे. मात्र खाजेकर हे गेल्या अनेक महिन्यापासून या महिलेकडून प्रचंड त्रस्त होते तसेच महिला सचिन खाजेकर यांना ब्लॅकमेल करत असल्याचे खाजेकर यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे.

Hill Line Police Station
'8 वर्षांपूर्वी 2 कोटीचं आश्वासन, आता फक्त 10 लाख नोकऱ्या; हे जुमला नाही महाजुमला सरकार'

सदर महिलेचा मृतदेह गाडीत कुजण्यास सुरवात झाल्याने गाडीत दुर्गंधी पसरली होती. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया हिललाईन पोलीस ठाण्यात सुरू होती. सचिन खाजेकरने सदर महिलेस मारून गाडीत २४ तास फिरवत होते. त्यामुळे ही हत्या कुठे झाली याबाबतीत पोलीस संभ्रमात होते. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com