Sangli Politics
Sangli Politics  Saam tv
महाराष्ट्र

Sangli Politics : ठाकरे गटाच्या सांगलीच्या उमेदवारावरून महाविकास आघाडीत धुसफूस; काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून बंडखोरीचे संकेत

Vishal Gangurde

Sangli Political News :

>>दिलीप कांबळे, मावळ

सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरु आहे. या लोकसभेच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेस कार्यकर्ते आमनसामने आले आहेत. सांगलीच्या उमेदवारावरून स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये पडसाद उमटताना दिसू लागले आहेत. 'सांगली मतदारसंघात विशाल पाटील यांना उमेदवारी मिळाली नाही तर वेगळा विचार करावा लागेल, अशी भूमिका काँग्रेस प्रदेश सचिव निखिल कवीश्वर यांनी घेतली आहे. (Latest Marathi News)

सांगली (Sangli) लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. ठाकरे गटाच्या भूमिकेनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. सांगली लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

'सांगली मतदारसंघात माजी मंत्री विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली विशाल पाटील हे गेल्या सात वर्षांपासून या मतदारसंघात काम करत आहे. सांगली हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. विशाल पाटील हे नक्कीच विजय मिळवतील, असा विश्वास निखिल कविष्कार यांनी व्यक्त करत सांगलीच्या जागेवर दावा ठोकला आहे.

काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाने १७ लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली. त्यात सांगली मतदारसंघातील उमेदवाराच्या नावाचाही सामावेश होता. ठाकरे गटाने काँग्रेससाठी कोल्हापूरची जागा सोडली, तर काँग्रेसने सांगलीची जागा सोडली पाहिजे, अशी ठाकरे गटाची भूमिका आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांनी उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करण्याआधी डबल केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांना सांगलीचं तिकीट देण्याचे संकेत दिले होते.

त्यानुसार, ठाकरे गटाच्या पहिल्या यादीत चंद्रहार पाटील यांचं नाव दिसलं. मात्र, चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवरून राज्यातील काँग्रेसचे नेतेही नाराज असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री वसंत पाटील यांचे नातू विशाल पाटील काँग्रेसकडून जागा लढविण्यासाठी इच्छुक होते. महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरु असताना उद्धव ठाकरेंनी सांगलीसाठी चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केली.

ठाकरे गटाच्या घोषणेनंतर काँग्रेसचं म्हणणं आहे की, 'ठाकरे गटाने आघाडीचा धर्म पाळायला हवा होता. आमची सांगलीच्या जागेसाठीची मागणी अद्याप कायम आहे, अशा प्रतिक्रिया काँग्रेस नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. याचदरम्यान, सांगलीत या जागेवरून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बंडखोरीचे संकेत दिले आहेत. या जागेचा योग्य तोडगा निघाला नाही तर त्याचा फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : मुंबई, ठाण्यासह राज्यातील 'या' भागात कोसळणार तुफान पाऊस; IMD कडून अलर्ट, वाचा वेदर रिपोर्ट

Madhuri Dixit : माधुरीच्या सौंदर्याने 'हे' दिग्गज अभिनेते झाले होते घायाळ, मात्र ती पडली डॉक्टरांच्या प्रेमात

Daily Horoscope: या राशींनी सतर्क राहा, ताण-तणावावर नियंत्रण ठेवा; वाचा आजचे राशिभविष्य

Rashi Bhavishya: कन्यासह ४ राशीसाठी बुधवार खास, तुमची रास?

Tata आणि Citroen च्या दोन नवीन कार ऑगस्टमध्ये होणार लॉन्च, जाणून घ्या फीचर्स

SCROLL FOR NEXT