Ramtek Lok Sabha: लोकसभेची उमेदवारी रद्द होताच रश्मी बर्वे संतापल्या; सरकारला सुनावले खडेबोल

Congress Rashmi Barve News: लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने रामटेक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रश्मी बर्वे यांची उमेदवारी रद्द केली आहे.
Congress Rashmi Barve News
Congress Rashmi Barve NewsSaam TV

Rashmi Barve Latest News

लोकसभा निवडणुकीपूर्वी विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का बसला. रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार रश्मी बर्वे यांची उमेदवारी निवडणूक आयोगाने रद्द केली. जात पडताळणी समितीने त्यांचे प्रमाणपत्र रद्द ठरवल्यानंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला. दरम्यान, लोकसभेची उमेदवारी रद्द होताच रश्मी बर्वे यांनी पत्रकारपरिषद घेत संताप व्यक्त केला. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Congress Rashmi Barve News
Ramtek Lok Sabha: लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; रश्मी बर्वे यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द

सत्तेतील हुकूमशाहीची राजवट आणि नेत्यांनी जो सत्तेचा माज आलेला आहे, तो आज या सगळ्या घडामोडीनंतर स्पष्ट झाला आहे, अशी टीका रश्मी बर्वे यांनी केली आहे. 'एकीकडे बेटी बचाव बेटी पढाव' असा नारा लावता आणि दुसरीकडे एका गरीब महिलेवर अन्याय करता. मात्र, मी सत्तेला घाबरणार नसून आणखीच खंबीर होणार, असा इशाराही बर्वे यांनी दिला आहे. (Lok Sabha Election 2024)

"जो व्यक्ती यांच्या विरोधात उभा राहतो, त्यांना ते संपण्याचे काम करीत आहेत. सरकारला लाज वाटायला पाहिजे, एका महिलेचं जात प्रमाणपत्र निवडणुकीच्या काळात रद्द केल्याचे तासाभरापूर्वी सांगता. तुमचे जास्त दिवस राहिले नसून सरकार लवकरच जाईल", असा संताप बर्वे यांनी व्यक्त केला. (Latest Marathi News)

"आम्ही सत्याच्या मार्गाने चालत आहोत. संघर्ष किती आला तरी आम्ही उच्च न्यायालयात आता दाद मागणार आहोत. सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर आम्हाला न्याय नक्कीच मिळेल. आमचा न्यायदेवतेवर पूर्णपणे विश्वास आहे", असंही बर्वे म्हणाल्या.

माझ्या नवऱ्याच्या म्हणजे श्याम कुमार बर्वे यांच्याही काही नामांकन अर्जावर आक्षेप घेतला होता. तुमच्यात एवढीच ताकद असेल, तर ती निवडणुकीच्या मैदानात दाखवा, असं आव्हान देखील बर्वे यांनी दिलं. मी २०२० मध्ये सुद्धा अनुसूचित जमातीचे सदस्य म्हणून निवडणूक लढवली होती. तेव्हा का आक्षेप घेतला नाही, असा सवालही त्यांनी विरोधकांना केला.

Congress Rashmi Barve News
Lok Sabha Election 2024 : ओवेसींचा पक्ष लढणार १६ जागांवर निवडणूक; वाढू शकते INDIA आघाडीची डोकेदुखी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com