Jat taluka Four year old girl Killed SaamTv
महाराष्ट्र

Sangli Crime : खेळण्याचं आमिष देऊन शेडमध्ये नेलं, ४ वर्षीय चिमुकलीची हत्या; नराधमाने अत्याचार केल्याचा संशय

Sangli Jat Taluka Four Year Old Girl Killed : सांगली तालुक्यातील जत तालुक्यात एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका ४ वर्षीय मुलीची नरधमाने हत्या केल्याचं समोर आलं आहे.

Prashant Patil

विजय पाटील (साम टीव्ही)

सांगली : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील करजगी येथे एका ४ वर्षीय चिमुकलीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं जत तालुक्यात नव्हे तर जिल्हा हादरला आहे. संशयित आरोपी याला उमदी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

करजगी गावाचा आज बाजार असल्याने चार वर्षांची चिमुकली याची शाळेत जाण्याची वेळ झाल्यानंतर आजूबाजू तिचा शोध घेत होते पण तिचा काही तपास न लागल्याने गावात दवंडी देऊन सुद्धा त्या मुलीचा तपास न लागल्याने ही माहिती गावचे पोलीस पाटील व ग्रामस्थांनी उमदी पोलीस स्टेशनला कळवली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले. पोलिसांना तिथेच काही अंतरावर पत्राच्या शेडसमोर बदामाच्या झाडाखाली सदर संशयित आरोपी हा दारूच्या नशेत झोपलेला आढळून आला. त्या संशयित नराधमाला उमदी पोलिसांनी ताब्यात घेतलं. चौकशी केली असता त्याने मुलीला खेळण्याचं आमिष देऊन गावानजीक असलेल्या आपल्या पत्रा शेडमध्ये घेऊन गेला आणि त्या अल्पवयीन मुलीचा खून केल्याची कबुली दिली आहे.

घराची झडती घेतली असता पेटीमध्ये पोते दिसले. पोत्यावर डाग असल्याने उघडून पाहिले असता मुलीचा मृतदेह आढळला. गावकऱ्यांनीही धक्कादायक प्रकार समजताच घटनास्थळी गर्दी केली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जत रुग्णालयात पाठवला आहे. संशयितांने पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचा संशय व्यक्त होत आहे. मात्र, त्याने हा खून कोणत्या कारणासाठी केला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस तपास सुरु असून या घटनेची सायंकाळपर्यंत कोणतीही नोंद पोलीस ठाण्यात झालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी विधान परिषदेमध्ये चर्चा

IGI Aviation Recruitment: एव्हिशन सर्व्हिसमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता काय? अर्जप्रक्रिया जाणून घ्या

Face Care: चेहऱ्यावर मध लावल्याने होऊ शकतात या गंभीर समस्या, वेळीच व्हा सावधान

Mumbai: १५० वर्षाचा कर्नाक पूल 'सिंदूर' ब्रिज का झाला? वाचा मुंबईकरांना फायदा काय होणार

Mumbai Accident: मुंबईत बस आणि ट्रकचा भीषण अपघात, ५ ते ६ प्रवासी गंभीर जखमी; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT