Maharashtra Politcs : अजित पवार नसते तर १०० आमदार निवडून आले असते; मंत्री गुलाबराव पाटील यांचं खळबळजनक वक्तव्य

Maharashtra Politcal News : मंत्री गुलाबराव पाटील यांनी महायुतीवर मोठं भाष्य केलं आहे. महायुतीत अजित पवार नसते तर आमचे १०० आमदार निवडून आले असते, असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.
mahayuti Latest News
mahayuti Saam tv
Published On

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही

नांदेड : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ८५ जागा लढणाऱ्या शिवसेनेच्या मंत्री गुलाबराव पाटील यांनी महायुतीवर मोठं वक्तव्य केलं आहे. विधानसभा निवडणुकीत अजित पवार महायुतीत नसते तर आमचे १०० आमदार निवडून आले असते. अजित पवारांची एन्ट्री मागून झाली, असं खळबळजनक वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपने १४८ जागा लढल्या होत्या. तर शिवसेनेने ८५ जागा लढल्या होत्या. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ५४ जागा लढल्या होत्या. महायुतीच्या मित्रपक्षाने ४ जागा लढल्या होत्या. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार मुसंडी मारली. शरद पवारांची साथ सोडून अजित पवार गटाने महायुतीला साथ दिली. विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाने ४१ जागा जिंकल्या. तर एकनाथ शिंदेंचे ५७ आमदार जिंकले. मात्र, महायुतीत अजित पवार नसते तर आम्ही १०० जागा जिंकल्या असत्या, असा दावा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

mahayuti Latest News
Shivsena UBT : ठाकरे गटाचे प्रतोद, गटनेते आणि सभागृह नेते ठरले; भास्कर जाधव यांच्यावर मोठी जबाबदारी

गुलाबराव पाटील यांच्या भाषणाचे मुद्दे

बालाजी कल्याणकर यांनी रडू रडू साडेतीन हजार कोटी रुपयांचा निधी मिळवला आहे. त्यांनी नांदेड जिल्ह्यात शिवसेना वाढवण्याचे काम केले. आपली मर्दाची शिवसेना आहे. या जिल्ह्यात तीन आमदार दिले आहेत. मी 25 वर्षांपासून आमदार आहे.

एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्यासाठी काही सडलेले अंडे बोलतात. आम्ही शिवसेना पक्षप्रमुख यांचे विचार जिवंत ठेवण्याचे काम केले आणि गुवाहाटीला गेलो. एकनाथ शिंदे यांनी ठाण्यावर वर्चस्व केलं. अनेक योजना या माणसाने आणल्या. त्यांना रेकॉर्ड ब्रेक मतदान झालं. s

mahayuti Latest News
Shivsena : दिल्लीत जाण्याआधी आज वर्षावर बैठक; शिवसेना आमदारांची धाकधूक वाढली!

एकनाथ शिंदे हा जादूगार माणूस आहे. बदनामी कितीही करा, या माणसाचे नाव काळजावर लिहितील. एकनाथ शिंदे माझ्या मतदारसंघात अडीच वर्षात २० वेळा आले. त्यांनी विविध योजना राबविल्या.

आम्ही फक्त ८० जागा लढलो. अजित पवार नसते, आमचे १०० आमदार झाले असते. त्यांची मागून एन्ट्री झाली. ही शेवटी वरची तरतूद आहे. शिवसेना सोडल्यानंतर पुन्हा निवडून येत नाही, असा इतिहास आहे. खरंतर आम्ही शिवसेनेतून फुटलो नाही. संजय राऊत फुटले. त्यांनी शिवसेना फोडली. त्यांनी बाळासाहेबांचे स्वप्न भंग केले.

mahayuti Latest News
Shivsena UBT Protest : ST भाडेवाढ, अख्ख्या महाराष्ट्रात 'चक्काजाम'; ठाकरे गट आक्रमक, पाहा VIDEO

आम्ही आयुष्य शिवसेनेला खर्ची घातलं. आम्ही ३५ वर्ष शिवसेनेला दिली. हरहर महादेवच्या घोषणा देऊन शिवसेना वाढवली. अनेक केस अंगावर घेतल्या. राऊतांच्या अंगावर एकही केस नाही .आमच्या सारख्या कार्यकर्त्यांमुळे शिवसेना वाढली. शिवसेना कोणी वाचवली असेल, तर एकनाथ शिंदे यांनी वाढवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com