Rescue efforts underway at a farm pond in Dafalapur, Sangli, where a tragic drowning claimed the lives of a mother and her son Saam Tv
महाराष्ट्र

पाणी आणायला गेले, घरी परतलेच नाहीत, मायलेकाचा मृत्यू; हृदयद्रावक घटनेनं अख्खा गाव हळहळला

Sangli News: सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात शेततलावात बुडून माय-लेकरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कर्नाटकातील मेंढपाळ कुटुंबावर शोककळा पसरली असून तिघांना दोराच्या सहाय्याने वाचवण्यात यश आले.

Omkar Sonawane

विजय पाटील, साम टीव्ही

सांगली, डफळापूर (ता. जत): येथील एका शेततलावात बुडून माय-लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. 25) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. या घटनेत कर्नाटकातील अकोळ (ता. निपाणी, जि. बेळगाव) येथील सुशीला विट्ट्याप्पा पडोळकर (वय 60) आणि त्यांचा मुलगा अनिल विट्ट्याप्पा पडोळकर (वय 25) यांचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मेंढपाळांचा ताफा मंगळवारी बाज येथून तळ उठवून डफळापूरजवळील दिलीप भोसले यांच्या मळ्यात सुमारे 800 मेंढ्यांसह मुक्कामाला थांबला होता. शेततलावालगत तळ ठोकण्यात आला होता. बुधवारी सकाळी सुशीला पडोळकर या पाणी आणण्यासाठी शेततलावात उतरल्या असता त्यांचा पाय घसरून त्या पाण्यात पडल्या. त्यांच्या आरडाओरडीनंतर त्यांना वाचवण्यासाठी चार नातेवाईकांनी तलावात उड्या मारल्या.

मात्र तलावात सुमारे 11 फूट पाणी असून, प्लास्टिक अस्तर असल्याने पाय घसरत होते आणि हाताला धरायला आधार मिळत नसल्याने सर्वचजण अडचणीत सापडले. सुमारे 15 मिनिटे जीव वाचवण्यासाठी धडपड सुरू असताना शेजारील शेतकऱ्यांनी तत्काळ मदतीला धाव घेत दोर टाकून हल्लाप्पा बासणे, सुनिता बासणे व लक्काप्पा पडोळकर यांना सुरक्षित बाहेर काढले. मात्र सुशीला पडोळकर आणि अनिल पडोळकर या माय-लेकरांना वाचवण्यात अपयश आले.

या घटनेची नोंद जत पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास हवालदार भाऊसाहेब कुंभार करत आहेत. या झालेल्या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर १७९८.७८ कोटी जमा, कोणत्या जिल्ह्यात किती पैसे?

VIDEO : अजितदादांचा घातपात असेल तर दोषींचा मुडदाही खणून काढू; मुख्यमंत्री फडणवीस विधानसभेत काय काय म्हणाले?

भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर चर्चांना उधाण, काय आहे सत्य?

Thursday Horoscope: नशिबाच्या साथीने महत्वाची कामे होतील पूर्ण; ५ राशींचा आनंदात जाणार दिवस, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Rohit Pawar : महाभागालाच NCP पक्ष ताब्यात घ्यायचा होता, तटकरेंकडून अप्रत्यक्ष रोहित पवारांचा डोमकावळा म्हणून उल्लेख

SCROLL FOR NEXT