Sangli District Bank Robbery News Saam tv
महाराष्ट्र

Bank Robbery : सांगलीत बँकेवर धाडसी दरोडा, मध्यरात्री खिडकी तोडून आत शिरले; २२ लॉकरमधील ९ लाख लंपास

Sangli District Bank Robbery News : सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील झरे येथील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेत २२ लॉकर फोडून ९.३० लाख रुपयांचे सोने-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास करण्यात आली. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

Alisha Khedekar

  • सांगलीत जिल्हा मध्यवर्ती बँकेत दरोडा

  • २२ लॉकर फोडून ९.३० लाखांचा ऐवज चोरीला

  • पुरावे नष्ट केल्याने पोलिस तपासात मोठा पेच.

  • अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल

सांगलीतून मोठी बातमी समोर आली आहे. आटपाडीतील झरे या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत दरोडा टाकत तब्बल २२ लॉकर फोडून, तब्बल नऊ लाख ३० हजार रुपयांची सोन्या-चांदीचे दागिने लंपास करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला असून अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, झरे बसस्थानक परिसरातील तुकाराम नाना पडळकर यांच्या मालकीच्या इमारतीत जिल्हा बँक भाड्याने सुरू आहे. ६ जानेवारी रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी बँकेच्या पूर्वेकडील बाजूची खिडकी धारदार शस्त्राच्या साहाय्याने कापून बँकेत शिरकाव केला. अत्यंत सराईतपणे त्यांनी स्ट्राँग रूममधील तब्बल २२ लॉकर तोडून ग्राहकांचे मौल्यवान सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लंपास केली. ही घटना सकाळी बँकेचे कर्मचारी कामावर आल्यानंतर उघडकीस आली.

दरोडेखोरांनी डल्ला मारण्यापूर्वी पूर्ण खबरदारी घेतल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. बँकेत प्रवेश करताच त्यांनी सर्वप्रथम सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले तसेच संशयास्पद हालचाली रेकॉर्ड झालेला डीव्हीआर (DVR) सोबत नेला आहे. हाताचे ठसे उमटू नयेत यासाठी हँडग्लोव्हजचा वापर केल्याचेही आढळले आहे.

घटनेची माहिती मिळताच आटपाडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. संबंधित घटनेचा तपास सुरु केला असून परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान दरोडेखोरांनी कोणताही पुरावा मागे न सोडल्याने आता पोलिसांसमोर तपासाचा मोठा पेच निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एसीबीची मोठी कारवाई, BMC च्या बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले, असा रचला सापळा

Maharashtra News Live Update: १ ऑगस्टपासून महिलांसाठी एनसीएमसी कार्ड सक्तीचे?

बँकांचा खातेदारांच्या 26 हजार कोटींवर डल्ला; किमान शिल्लकच्या नावाखाली वसुली

Accident : भाजपच्या बड्या नेत्याचा अपघात, राष्ट्रीय महामार्गावर कारची ट्रकला जोरदार धडक

Kangana Ranaut: कंगना रनौतच्या उलट्या बोंबा सुरूच; राखी सावंतची कंगनाला चोपण्याची भाषा

SCROLL FOR NEXT