teachers , sangli dcc bank , notice , loan saam tv
महाराष्ट्र

कार्यवाही सुरु; ३५० शिक्षकांसह मुख्याध्यापकांना नाेटीसा, गट शिक्षणाधिकारीही अडचणीत

त्यामुळे सर्व संस्था टार्गेटवर जिल्हा बँकेच्या आहेत असंही सांगितलं जात आहे.

विजय पाटील

Sangli DCC Bank News : सांगली जिल्ह्यातील शिक्षकांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 25 कोटी रुपयांची कर्जे थकवले आहेत. संबंधित 350 शिक्षक (teacher) आणि मुख्याध्यापकांना बँकेने (dcc bank) कर्ज वसुलीसाठी नोटीसा पाठवल्या आहेत. त्यामुळे वसुलीत सुधारणा होत आहे असे बॅंकेच्या अधिका-यांनी नमूद केले.

जिल्हा बॅंकेच्या कर्जे थकवलेल्या शिक्षकांमध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांचा यामध्ये समावेश आहे. जिल्हा बँकेने शिक्षकांना 25 कोटी रुपयांची कर्जे दिली होती. यातील बहुतांश शिक्षकांना याच बँकेतून वेतन मिळत होते. त्यानंतर काही शिक्षकांनी आपले वेतन अन्य बँकेत करण्यासाठी प्रयत्न केले. त्यात त्यांना यश ही आले.

त्यामुळे जिल्हा बँकेची कर्जे थकले आहेत. विशेष म्हणजे जिल्हा बँकेची कर्ज देताना संबंधित शाळेचे मुख्याध्यापक गट शिक्षणाधिकारी यांचे हमीपत्र घेतले आहे. त्यानुसार जिल्हा बँकेने सध्या जोरदार कारवाई सुरू केली आहे. मात्र घेतलेली हमीपत्रे ठराविक नमुन्यात नसल्याचा गैरफायदा संबंधित शिक्षकांनी उचलला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.

या पार्श्वभूमीवर संबंधित शिक्षकांकडून नियमाप्रमाणे हमीपत्र घेण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू झाले आहे असेही सूत्रांनी स्पष्ट केले. बँकेकडून थकीत कर्जे वसुलीसाठी जोरदार मोहीम राबवली जात आहे. एनपीएसाठी प्रशासनाचा सध्या संकल्प असून त्यासाठी सर्वच कर्जदारांना नोटीसा देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये बडे कर्जदार संस्थांचाही समावेश आहे. त्यामुळे सर्व संस्था टार्गेटवर जिल्हा बँकेच्या आहेत असंही सांगितलं जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashane Waterfall : रायगडचे सौंदर्य वाढवणारा 'आषाणे' धबधबा, तुम्ही कधी पाहिला का?

Weight Loss: वजन कमी करण्यासाठी 'हे' नॅचरल फॅट बर्नर पदार्थ रोज खा!

Congress: 'बिडी-बिहार'च्या पोस्टनं राजकारण तापलं; वादानंतर काँग्रेसचा माफीनामा

Hair Care Tips: हे 'काळे पाणी' तुमच्या केसांच्या सर्व समस्या करतील मूळापासून दूर, एकदा नक्की ट्राय करुन पाहा

Mumbaicha Raja : 'मुंबईचा राजा...' म्हणू नका! रोहित शर्मानं चाहत्यांना रोखलं, VIDEO

SCROLL FOR NEXT