Sangli Crime Saam tv
महाराष्ट्र

Sangli Crime News : दागिने लंपास करणारे चोरटे ताब्यात; ९० हजाराचे दागिने हस्तगत

Sangli News : डोळ्यात चटणी टाकली होती. इतकेच नाही तर त्यांना चाकूचा धाक दाखवित बोरमाळ, गंठण, कर्णफुले असे सोन्याचे दागिने चोरून पोबारा केला

विजय पाटील

सांगली : चोरट्यांनी घरात घुसून मोठे धाडस करत चोरी केली होती. घरातील सदस्यांच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचे दागिने लंपास केले होते. पोलिसांनी तपास करत दागिने चोरी करणार्‍या तिघां चोरट्याना पोलिसांनी अटक केली आहे. संजयनगर पोलिसांनी हि कारवाई केली असून त्याच्याकडून ९० हजाराचे दागिने हस्तगत केले आहेत. 

सांगली (Sangli) शहरातील दत्त कॉलनीत हा धाडसी चोरीची घटना घडली होती. दत्त कॉलनीतील व्यायामशाळेजवळ राहणार्‍या संगीता रामचंद्र ठोंबरे यांच्या घरात घुसून तिघा चोरट्यांनी पती रामचंद्र ठोंबरे यांच्या डोळ्यात चटणी टाकली होती. इतकेच नाही तर त्यांना चाकूचा धाक दाखवित बोरमाळ, गंठण, कर्णफुले असे सोन्याचे दागिने चोरून पोबारा (Crime News) केला होता. या प्रकरणी ठोंबरे दाम्पत्याने संजयनगर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी सदर घटनेचा तपास सुरु केला होता. 

दरम्यान संजयनगर पोलिसांनी (Police) तपास करत वाहिद मुसा पखाली (वय ४९), सलीम मेहबुब शेख (वय ३५) आणि तातोबा लक्ष्मण कांबळे (वय ५०) या तिघांना अटक केली आहे. अटक करतेवेळी त्यांच्याकडून केवळ मोबाईल जप्त करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी तिघांची कसून चौकशी करीत चोरीतील बोरमाळ, गंठण व कर्णफुले असा ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई संजयनगर पोलिसांनी केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Flight Ticket New Rule: प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी, विमान प्रवासाच्या नियमात मोठे बदल; यापुढे तिकीट बुकिंग करताना...

Sara Ali Khan: साराला केदारनाथचे दरवाजे बंद? फक्त हिंदूंनाच केदारनाथचं दर्शन मिळणार?

Summer Vacation: शिक्षकांच्या उन्हाळी सुट्ट्या रद्द? मे महिन्यात शिक्षकांचे भरणार क्लास

Thursday Horoscope : जवळच्या व्यक्तींचा सल्ला फायदेशीर ठरेल; ५ राशींच्या लोकांचे नशीब पालटणार

ZP teacher suspension: ZP शिक्षक बदली प्रकरणात बड्या अधिकाऱ्यासह 4 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई, शिक्षण विभागात खळबळ

SCROLL FOR NEXT