Pandharpur News : विठ्ठल मंदिरातील बाजीराव पडसाळी आपत्कालीन व्यवस्थेसाठी राखीव; हाथरसच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीची खबरदारी

Pandharpur News : पंढरपूरची आषाढी यात्रेनिमित्ताने भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. येत्या १७ जुलैला आषाढी एकादशीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
Pandharpur News
Pandharpur NewsSaam tv
Published On

पंढरपूर : हाथरस येथे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आपत्कालीन व्यवस्था तयार करण्यात आली आहे. विठ्ठल मंदिरातील बाजीराव पडसाळी हा परिसर आपत्कालीन व्यवस्थेसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. यामुळे आषाढी यात्रेच्या अनुषंगाने भाविकांची होणाऱ्या गर्दीत काही गोंधळ निर्माण झाल्यास या आपत्कालीन व्यवस्थेचा उपयोग करता येणार आहे.  

Pandharpur News
Online Fraud : सेवानिवृत्त बँक मॅनेजरला ७२ लाखांचा गंडा; तीन जणांना मानपाडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पंढरपूरची (Pandharpur) आषाढी यात्रेनिमित्ताने भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. येत्या १७ जुलैला आषाढी एकादशीचा (Ashadhi ekadashi) सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल होत असतात. याच दरम्यान विठ्ठल मंदिरामध्ये देखील दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना चांगले दर्शन घेता यावे यासाठी मंदिर समितीने चोख तयारी केली आहे. मंदिरात प्रवेश करण्यापासून तर दर्शन घेऊन बाहेर पडणाऱ्या भाविकांना त्रास होणार याची खबरदारी मंदिर समितीने घेतली आहे. 

Pandharpur News
Ambarnath News : अंबरनाथ नगरपालिकेच्या विभागप्रमुखाला तक्रारदाराची मारहाण; मारहाणीच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांचे कामबंद

अलीकडेच हाथरस येथे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने व मंदिर समितीने विठ्ठल मंदिरातील (Vitthal Mandir) बाजीराव पडसाळी हा परिसर आपत्कालीन व्यवस्थेसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान यात्रा काळात विठ्ठल मंदिरात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास भाविकांना मंदिरातून व्यवस्थित बाहेर पडता यावे. यासाठी विठ्ठल मंदिरातील बाजीराव पडसाळी हा परिसर मोकळा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून इथूनच भाविकांना बाहेर पडण्याचा आपत्कालीन मार्ग देखील तयार करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com