sangli Accidnet Saam Tv
महाराष्ट्र

Sangli Accident News: पोलिसांच्या वाहनाला अपघात; दुचाकी आडवी आल्याने निर्भया पथकाचं वाहन उलटलं , तिघे जखमी

Sangli Accident News: सांगलीतून अपघाताची एक घटना समोर आली आहे. सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यात पोलिसांच्या निर्भया पथकाच्या वाहनाचा अपघात झाला आहे.

विजय पाटील

Sangali accident News:

सांगलीतून अपघाताची एक घटना समोर आली आहे. सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यात पोलिसांच्या निर्भया पथकाच्या वाहनाचा अपघात झाला आहे. बेडग गावातील शाळांची तपासणी करून परत असताना निर्भया पथकाच्या वाहनाचा अपघात झाला आहे. या अपघातात तीन पोलीस किरकोळ जखमी झाले आहेत. (Latest Marathi News)

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बेडग गावातील शाळांची तपासणी करून निर्भया पथकाचे पोलीस मिरजकडे जात होते. त्यावेळी एक दुचाकीस्वार आडवा आला, त्यावेळी बचाव करताना पोलीसांचं वाहन चालविणाऱ्या चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं. या अपघातात पोलीसाचं वाहन उलटल्याची घटना घडली आहे.

कसा झाला अपघात?

बेडग ते आडवा रस्त्यावरून चारचाकी वाहनाने निर्भया पथकाचे पोलीस मिरजकडे चालले होते. त्यावेळी एक दुचाकीस्वार आडवा आला. त्यावेळी पोलीस वाहन चालकाचा ताबा गाडीवरून सुटला. त्यानंतर निर्भया पथकाचं वाहन शेताच्या कडले उलटलं.

या अपघातात निर्भया पथकातील एएसआय संभाजी धेंडे, अजित कोळेकर, इरवंत येमलवाड जखमी झाले. तर या अपघातात दुचाकीस्वार महादेव रायप्पा देखील गंभीर जखमी झाला. त्याच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

अपघातस्थळी दारूच्या बाटल्या आढळल्या आहेत. त्यामुळे दुचाकीस्वार मद्य प्राशन करून गाडी चालवत असल्याने अपघात झाला का, असा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: पैसा टिकत नाहीये? चाणक्यांचे हे ६ नियम बदलू शकतात तुमचं आर्थिक आयुष्य

Torrent Power Karjat Project: विरोधकांचे फेक नरेटिव्ह; कर्जतचा प्रकल्पातील वृक्षतोडीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra News Live Update: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात ११वा आरोपी अटकेत; प्रांजल ठकरानला ६ दिवसांची पोलीस कोठडी

Vaidehi Parshurami: फुलांनी सजली वैदेही परशुरामी! अभिनेत्रीच्या खास फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

Chakli Recipe : दिवाळीत कुरकुरीत चकली करायची? भाजणीचीही गरज नाही अन् वेळही वाचणार, फक्त फॉलो करा ही रेसिपी

SCROLL FOR NEXT