Washim Crime News: ZP शाळेच्या शिक्षकाला पेट्रोल ओतून पेटवलं; उपचारादरम्यान शिक्षकाचा मृत्यू

Washim Crime News: झेडपी शाळेच्या शिक्षकाला अज्ञात व्यक्तींनी पेट्रोल ओतून पेटवल्याची धक्कादायक घटना घडलीये.
washim Crime News
washim Crime NewsSaam tv
Published On: 

मनोज जयस्वाल

Washim crime News:

वाशिमच्या मालेगावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. या भागातील झेडपी शाळेच्या शिक्षकाला अज्ञात व्यक्तींनी पेट्रोल ओतून पेटवल्याची धक्कादायक घटना घडलीये. या हल्ल्यानंतर शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील मालेगाव-बोरगाव रस्त्यावर कोल्ही शिवारात हा प्रकार घडला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, वाशिमच्या मालेगाव-बोरगाव रस्त्यावर कोल्ही शिवारात शिक्षकाला अज्ञात व्यक्तींनी रॉडने डोक्यावर मारहाण करून पेट्रोल ओतून पेटवले. या हल्ल्यात शिक्षक दिलीप धोंडोजी सोनवणे हे गंभीर जखमी झाले.

या हल्ल्यानंतर रुग्णालयात दाखल केलेल्या शिक्षक दिलीप यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शिक्षकाच्या मृत्यूनंतर झेडपी शाळेच्या शिक्षकांच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

washim Crime News
Sangli Crime News : सामाजिक कार्यकर्ते असल्याचे भासवत...15 लाखांची खंडणीप्रकरणी सांगलीत तिघांना अटक

नेमकं काय घडलं?

दिलीप धोंडोजी सोनवणे हे मालेगाव तालुक्यातील बोरगाव जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. आज सोमवारी बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत जात असताना शिक्षक दिलीप सोनवणे यांचा अज्ञात व्यक्तींनी रस्ता अडवला.

washim Crime News
Crime News: डोंबिवलीच्या ग्रामीण भागात देहव्यापार; बंगल्याखालील खोल्यांमध्ये डांबलं होतं बांगलादेशी मुलींना

मालेगाव-बोरगाव रोडवर कोल्ही शिवारात अज्ञात व्यक्तींनी दिलीप सोनवणे यांचा रस्ता अडवून त्यांच्या डोक्यावर रॉडने मारहाण केली. त्यानंतर अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतलं आणि पेटवून दिलं.

या घटनेत शिक्षक दिलीप सोनवणे गंभीररित्या जखमी झाले. त्यानंतर स्थानिकांनी त्यांना वाशिम येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी शिक्षक दिलीप सोनवणे यांना मृत घोषित केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com