Sangli News  Saam tv
महाराष्ट्र

Sangli : सांगलीत 'मुळशी पॅटर्न'! दलित महासंघाच्या अध्यक्षांच्या हत्येनंतर आणखी एकावर हल्ल्याचा प्रयत्न, घटना सीसीटीव्हीत कैद

Sangli News : दलित महासंघाच्या अध्यक्षांच्या हत्येनंतर आणखी एकावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. या हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.

विजय पाटील

सांगलीत 'मुळशी पॅटर्न'

उत्तम मोहिते यांची निर्घृण हत्या

मोहिते यांच्यानंतर आणखी एकावर हल्लाचा प्रयत्न

सांगलीत 'मुळशी पॅटर्न' सिनेमातील दृश्याप्रमाणे एकाची हत्या झाली. वाढदिवसाच्या दिवशी दलित महासंघाच्या प्रदेशाध्यक्ष उत्तम मोहिते यांची निर्घृण हत्या झाली. मोहितेंच्या हत्येने सांगलीत खळबळ उडाली असताना आता आणखी एकावर जीवघेणा हल्लाचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

सांगलीच्या मिरज शासकीय रुग्णालय येथे निखिल कलगुडगी खुनातील आरोपींच्यावर जीवघेणा हल्ला करण्याच्या उद्देशाने आलेल्या हल्लेखोराला वेळीच रिवाल्वरसह पोलिसांनी ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या आहेत. या ठिकाणी आणखी तीन संशयित मात्र पळून जाण्यास यशस्वी झाले आहेत. या घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

निखील कलगुटगी याचा जुन्या वादातून निर्घृण हत्या झाली. यामध्ये 13 आरोपींना या हत्येच्या गुन्हात अटक करण्यात आली आहे. या हत्येतील आरोपी सलीम पठाण, चेतन सुरेश कलगुटगी, विशाल बाजीराव शिरोळे, सुहेल जमीर लांचोळी यांना काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली होती. या आरोपींना आज वैद्यकीय तपासणीसाठी मिरज शासकीय रुग्णालय येथे मिरज शहर पोलीस घेऊन गेले होते. या ठिकाणी सलीम पठाण चेतन कलगुडगी यांचे समर्थकांची मोठी गर्दी झाली होती.

यावेळी आरोपींवर जीवघेणा हल्ला करण्याच्या उद्देशाने काही हल्लेखोर आले होते. यावेळी एका पोलीस कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे त्या तरुणाला हल्ला करण्याच्या आधीच ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक रिवाल्वर जप्त केलं आहे. हल्लेखोरासोबत आलेले साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले. यावेळी मिरज उपविभागी पोलीस अधिकारी प्रणील गिलडा मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांच्यासह मोठा पोलीस फौज फाटा यावेळी मिरज शासकीय रुग्णालय येथे दाखल झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी आणि पोलिसांत शाब्दिक बाचाबाची|VIDEO

Devendra Fadnavis : डॉ बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक कधी पूर्ण होणार? मुख्यमंत्र्यांनी सांगितली डेडलाईन

Prajakta Gaikwad New Video: लग्नानंतर प्राजक्ताचा पारंपारिक पद्धतीने चुडा उतरवण्याचा कार्यक्रम; व्हिडीओ पाहून होतय सौंदर्याचं कौतुक

Maharashtra Live News Update: शिक्षकांची बदली होत असल्याने ग्रामस्थांनी शाळेला ठोकले टाळे

Horoscope: जुळून येती रेशीमगाठी!नात्यातील अडचणी होतील दूर; 'या' राशींसाठी आहे आनंदाचा दिवस

SCROLL FOR NEXT