River
River Saam tv
महाराष्ट्र

Sangali Crime : मित्रानेच केला घात; अपहरण करत केली निर्घृण हत्या;पुढे मृतदेहाचं जे केलं ते काळजाचा थरकाप उडवणारं

विजय पाटील

Crime News : सांगली येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. किरकोळ कारणातून झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून मित्रांनी आपल्या मित्राचं अपहरण करत त्याची निर्घृण हत्या केली आहे. तसेच या बाबत कुठेही माहिती पसरूनये म्हणून मित्रांनी त्याचा मृतदेह देखील जाळून टाकला आणि राख नदीमध्ये टाकली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest crime news)

मिळालेल्या माहितीनुसार, मित्राचा मृतदेह जाळून टाकल्याची धक्कादायक घटना सांगलीच्या वाळवा तालुक्यातील बावची या ठिकाणी घडली आहे. ओंकार रकटे असं मृत्य तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी आष्टा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ओंकार रकटे (वय वर्ष 23) या तरुणाचं आधी अपहरण करण्यात आलं. त्यानंतर त्याची हत्या करत मृतदेह जाळून हाडे नदीत टाकली. धक्कादायक बाब म्हणजे त्याच्या मित्रांनीच तरुणाचा घात केला आहे.

मित्रच का झाला शत्रू?

या प्रकरणी आष्टा पोलिसांनी सम्मेद सावळवाडे,भरत काटकर आणि राकेश हालुंडे अशा तीन मित्रांना अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी सम्मेद सावळवाडे आणि ओंकार रकटे यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. या भांडणाचा राग सम्मेद याच्या मनात निर्माण झाला होता. यातून सम्मेदने आपल्या मित्रांसमवेत ओंकार रकटे याचे अपहरण केलं होतं.

त्यानंतर ओंकारला मारहाण करत त्याचा गळा आवळून खून केला. खुनाच्या घटनेनंतर ओंकारचा मृतदेह स्मशानभूमीत नेऊन जाळून टाकला. त्यानंतर त्याच्या मृतदेहाची राख आणि हाडे पोत्यात भरून कृष्णा नदीमध्ये टाकून देण्यात आली, अशी कबुली तीन संशयित मित्रांनी दिली असून याप्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heat Wave Alert: देशात उष्णतेचा स्फोट! या राज्यात 8 दिवस राहणार उष्णतेची लाट, हवामान खात्याचा इशारा

Menstrual Care: मासिक पाळीमध्ये प्रचंड वेदना होतात का? 'हे' उपाय केल्यास पोटदुखी कमी होईल

Lok Sabha Election: काँग्रेसविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी, केसीआर यांच्यावर ४८ तासांची प्रचारबंदी; निवडणूक आयोगाची कारवाई

Today's Marathi News Live : ​दिलीप वळसे पाटील यांना उपचारासाठी पुण्यात हालवले

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये Dining Table कुठे असावा? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT