Crime News: खळबळजनक! बीडमध्ये अर्धनग्न अवस्थेत आढळली 35 वर्षीय महिला; अत्याचार झाल्याचा संशय

पोलिसांनी या महिलेला वैद्यकीय तपासासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
Beed Crime News
Beed Crime NewsSaam Tv

Beed News: बीड शहरातील यशवंतराव चव्हाण चमन उद्यानात, 35 वर्षीय महिला अर्धनग्न व शुद्ध हरपलेल्या अवस्थेत दिसून आल्याने खळबळ एकच उडाली आहे. आज पहाटे याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या महिलेवर अत्याचार करण्यात आल्याचाही प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे, ज्यामुळे बीड शहरातील महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे. (Latest Marathi News)

Beed Crime News
Nashik News: संतापजनक! रुग्णालयातील डॉक्टर- कर्मचारी सुट्टीवर, आईलाच करावी लागली मुलीची डिलिव्हरी

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, बीड (Beed) शहरातील यशवंतराव चव्हाण चमन उद्यानात, 35 वर्षीय महिला अर्धनग्न व शुद्ध हरपलेल्या अवस्थेत आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या महिलेला 2 ते 3 अज्ञात लोकांनी तुझा पती तिकडे थांबला आहे, असे खोटे सांगून तिला यशवंतराव चव्हाण उद्यानामध्ये नेले. त्याठिकाणी तिच्या जवळचा मोबाईल काढून घेतल्याचेही तपासामध्ये समोर आले आहे.

याबाबतची माहिती पोलिसांना कळवल्यानंतर ही धक्कादायक बाब उघड झाली आहे.

Beed Crime News
Udhav Thackeray: सभेची जय्यत तयारी! गोळीबार मैदानात ठाकरी तोफ धडाडणार; टीझरही प्रदर्शित

पोलिसांनी तिला वैद्यकीय तपासण्यासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. तपासणीनंतर तिच्यासोबत अनुचीत प्रकार घडला आहे का ? याबद्दलची माहिती समोर येईल. मात्र यामुळे बीड शहरात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनल्याचे समोर आले आहे. दरम्यान, बीड शहरात अल्पवयीन नशेखोराकडून अवघ्या तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच हा प्रकार समोर आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com