Sangli crime news Mulshi Pattern style killing Saam TV Marathi News
महाराष्ट्र

Sangli crime : सांगलीत 'मुळशी पॅटर्न' स्टाईल खून, वाढदिवशीच नेत्याची हत्या, त्यानंतर...

Sangli crime news Mulshi Pattern style killing : सांगलीत दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहिते यांची वाढदिवसाच्या दिवशी निर्घृण हत्या करण्यात आली. ‘मुळशी पॅटर्न’ स्टाईलने झालेल्या या हल्ल्यात आरोपी शाहरुख शेखचाही संतप्त जमावाकडून मृत्यू झाला. सांगली हादरून गेली आहे.

Namdeo Kumbhar

  • सांगलीत दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहिते यांची वाढदिवशी निर्घृण हत्या झाली.

  • रेकॉर्डवरील गुन्हेगार शाहरुख शेख याने तलवार व चाकूने हल्ला केला.

  • संतप्त जमावाने हल्लेखोराला बेदम मारहाण केली व उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.

  • या थरारक घटनेमुळे सांगली परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिस तपास सुरू आहे.

विजय पाटील, सांगली प्रतिनिधी

Sangli Uttam Mohite murder case full story : सांगलीमध्ये 'मुळशी पॅटर्न' स्टाईल नेत्याची हत्या केल्याची थरारक घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे, वाढदिवसाच्या दिवशीच दलित महासंघाच्या मोहिते गटाच्या अध्यक्षाचा अतिशय निर्घृण खून करण्यात आला. उत्तम मोहिते असं खून करण्यात आलेल्या दलित महासंघाच्या अध्यक्षाचे नाव आहे. वाढदिवस साजरा करताना रेकॉर्डरवरील अट्टल गुन्हेगार शेख याने हल्ला केला. या घटनेनंतर सांगलीमध्ये एकच खळबळ उडाली. उत्तम मोहितेंचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपीचाही मृत्यू झाला आहे.

उत्तम मोहिते यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच सांगलीमध्ये मुळशी पटर्न चित्रपटातील दृश्याप्रमाणे घटना घडली. उत्तम मोहिते हे दलित महासंघाचे मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष होते. मंगळवारी त्यांचा वाढदिवस त्यांच्याच घराजवळ साजरा करण्यात येत होता. या निमित्ताने केक कापण्याचा व जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार शाहरुख शेख याने उत्तम मोहिते यांच्यावर तलवार-चाकूने जोरदार हल्ला केला.

शेख याच्या हल्ल्यात मोहिते गंभीर जखमी झाले. रक्ताच्या थरोळात पडलेल्या उत्तम मोहिते यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेवेळी हल्लेखोर शेख याला संतप्त जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली. तो या हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल कऱण्यात आले होते. पण उपचारावेळी त्याचाही मृत्यू झाला. घटनेनंतर शासकीय रुग्णालय परिसरासह घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र ही घटना नेमकी का घडली? हे अद्याप स्पष्ट होऊ शकला नाही, पण खूनाच्या या थरारक घटनेने सांगली हादरून गेली आहे.

उत्तम मोहिते याची हत्या का करण्यात आली? शेख याने कार्यक्रमात मोहिते यांच्यावर हल्ला का केला होता? दोघांमध्ये कोणत्या गोष्टींमुळे वाद होता का? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. उत्तम मोहितेंच्या वाढदिवसाच्या दिवशीचा हल्ला करत शेख याने खून केला होता. हल्ल्याच्या घटनेनंतर संतप्त जमावाकडून हल्लेखोर शाहरुख शेख याला बेदम मारहाण करण्यात आली होती. शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना हल्लेखोर शहारुख शेख याचाही मृत्यू झाला आहे. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना उत्तम मोहितेंचा खून करण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: दारू पार्टीत कडाक्याचे भांडण, रागाच्या भरात तरुणांनी मित्राच्या बायकोलाच संपवलं

Buldhana Crime: बोगस मतदाराला पोलिसाच्या ताब्यातून सोडवलं, आणला सरकारी कामात अडथळा; आमदाराच्या मुलासह ४ जणांवर गुन्हा दाखल

Local Body Election: मतदानाआधी पिंपळपारमध्ये पैसे वाटप,निलेश राणेंचा भाजपवर पैसे वाटपाचा आरोप

Maharashtra Nagar Parishad Live : जालना जिल्ह्यातील नगरपालिका मतदान टक्केवारी

Kalyan News: शहरात एकाच नंबरच्या दोन रिक्षा; दंड ठोठावल्यानंतर झाला कल्याणमधील बनावट नंबरप्लेटचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT