Sangli Saam Tv
महाराष्ट्र

Sangli: नीट सराव परीक्षेत कमी गुण, शिक्षक बापानं १७ वर्षीय लेकीला बेदम मारलं, जागीच मृत्यू

Sangli Crime Father Killed Daughter For get less Marks in NEET: नीटच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून वडिलांनी आपल्या लेकीचा जीव घेतला आहे. तिला बेदम मारहाण केली त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Siddhi Hande

डॉक्टर होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. डॉक्टर होण्यासाठी सर्वात आधी नीट परीक्षा द्यावी लागते. नीट ही देशातील सर्वात अवघड परीक्षांपैकी एक आहे. नीटच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून बापानेच पोटच्या पोरीला मारलं आहे. खाजगी शिकवणीत बारावीच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यानंतर झालेल्या वादातून चिडलेल्या जन्मदात्या बापाने आपल्या लेकीला बेदम मारहाण केली. त्या मारहाणीत त्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे ही घटना घडली आहे. साधना धोंडीराम भोसले वय 17 असे मृत मुलीचे नाव आहे. याप्रकरणी गावातील माध्यमिक शाळेत शिक्षक असलेले त्याचे वडील धोंडीराम भगवान भोसले यांना पोलिसांनी अटक केली आहे. मुलीच्या आईनेच आपल्या पतीविरोधात पोलिसात तक्रार केली आहे. मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने दुःखाचा डोंगर कोसळलेल्या तिच्या आईला आपल्या पती विरोधात पोलिसात फिर्याद देण्याचे वेळ आली.

धोंडीराम भोसले राहणार नेलकंजी येथे माध्यमिक विद्यालयात शिक्षक आहेत. त्यांचे वडील भगवान भोसले त्याच शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पोलीस पाटील होते. पत्नी प्रीती गावच्या माजी सरपंच आहेत. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहेत.

साधना आटपाडीत बारावीचे शिक्षण घेत होती. मेडिकलसाठी प्रवेश घेण्यासाठी ती तयारी करत होती. डॉक्टर होण्याचे तिचे आणि तिच्या कुटुंबियांचे स्वप्न होते. त्यासाठी खाजगी शिकवणी लावली होती. त्या शिकवणीत नुकतीच एक सराव परीक्षा झाली होती. त्यात तिला कमी गुण मिळाले त्यामुळे वडील धोंडीराम चिडले होते.

शुक्रवारी रात्री वडील धोंडीराम यांनी मुलगी साधनाला कमी गुण का मिळाले याचा जाब विचारत मारहाण केली. घरातच असलेल्या दगडी जात्याच्या लाकडी खुंट्याने साधनाला जबर मारहाण केली. साधनाच्या डोक्याला जबर मार लागला संपूर्ण शरीराला इजा झाली. तिला दवाखान्यात नेले असता उपचार दरम्यान तिचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

Crime : मैत्रिणीला भेटून घरी जात होती, नराधमांनी कारमध्ये ओढलं; १६ वर्षीय मुलीवर धावत्या कारमध्ये लैंगिक अत्याचार

Mahashtra Politics : महायुतीत नाराजीनाट्य; माधुरी मिसाळांच्या बैठकीवर शिरसाटांची नाराजी, नेमकं काय घडलं? VIDEO

Ladki Bahin Yojana : लाडकीच्या पैशांवर भावांचा डल्ला, 14 हजार भावांनी लाटले तब्बल 21 कोटी

Maharashtra Politics : धनंजय मुंडे पुन्हा मंत्रीपदी? अजित पवारांनी दिले संकेत, नेमकं काय म्हणाले? VIDEO

SCROLL FOR NEXT