Solapur : जामिनावर सुटताच अनेकांना हेरले; नीट परीक्षेत गुण वाढवून देण्याचे सांगत फसवणूक, सीबीआयने घेतले ताब्यात

Solapur News : सोलापुरातील नामांकित रेसिडेन्सीमध्ये राहत असून परिसरात कोणाशीच संवाद किंवा संपर्क नसायचा. त्याच्या डोक्यात केवळ लोकांना गंडा घालण्याच्या योजनाच चालायच्या अशी माहिती सूत्रांनी दिली
Solapur News
Solapur NewsSaam tv
Published On

सोलापूर : मेडिकल फिल्डसाठी आवश्यक असलेल्या नीट परीक्षेत मिळालेले गुण महत्त्वाचे ठरत असतात. या नीट परीक्षेत गुण वाढवून देतो; असे सांगून लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. अशा पद्धतीने अनेकांची फसवणूक करणाऱ्या संदीप शहा यास सीबीआयने ताब्यात घेतले आहे. दरम्यान त्याच्यावर यापूर्वी देखील फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. 

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने म्हणजेच सीबीआयने संदीप जवाहर शहाला अटक केली आहे. संदीप हा सोलापुरातील विजापूर रोडवरील नामांकित रेसिडेन्सीमध्ये राहात असून या परिसरात त्याचा कोणाशीच संवाद किंवा संपर्क नसायचा. त्याच्या डोक्यात केवळ लोकांना गंडा घालण्याच्या योजनाच चालायच्या अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यातूनच त्याने अनेकांना गंडा घातला आहे. 

Solapur News
Kolhapur Crime : साथीदारांसोबत नोकराने आखला चोरीचा प्लॅन; पावणेदोन कोटी रुपये चोरणारी टोळी ताब्यात

८७ लाख ५० हजार रुपये घेतले 

संदीप शहा हा संधी साधून फसवणूक करण्याचे प्लॅन आखत असायचा. यातच दोन महिन्यांपूर्वी मेडिकल फिल्डसाठीची नीट परीक्षा झाली होती. या परीक्षेत मिळालेल्या गुणांवर मेडिकलला नंबर लागत असतो. यातूनच संदीप शहा याने काही जणांशी संपर्क साधत नीट परीक्षेत गन वाढवून देण्याचे सांगितले. काही दिवसांपूर्वी नीट २०२५ च्या परीक्षेत गुण वाढवून देण्यासाठी ९० लाखांची मागणी करतं ८७ लाख ५० हजार रुपये घेतले होते. या प्रकरणी संदीप शाह याला CBI ने अटक केली आहे. 

Solapur News
Bus Accident : दैव बलवत्तर! काळ होता पण वेळ नव्हती; प्रवाशांनी भरलेली बस विहिरीत कोसळताना थोडक्यात राहिली

२०१८ मध्ये तीन गुन्हे दाखल 

नीट परीक्षेतील फसवणूक प्रकरणी संदीपला अटक केल्यानंतर तब्बल आठ वर्षांनी त्याचे नाव पुन्हा चर्चेत आले. संदीप शहा याच्यावर सोलापुरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये २०१८ पूर्वीच फसवणुकीचे तीन गुन्हे दाखल झाले होते. दरम्यान वैद्यकीय महाविद्यालयात मुलीला व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याची थाप मारून संदीपने सोलापूरसह राज्यातील अनेकांची फसवणूक केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com