Sangli Palus Educational Director Murder News Saam Tv
महाराष्ट्र

Sangli : नामांकित शिक्षण संस्थेच्या संचालकाची निर्घृण हत्या; अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये मृतदेह सापडला, सांगलीतील धक्कादायक घटना

Sangali Crime News : सांगलीतील पलूस येथे शिक्षण संस्थेचे संचालक संजय परांजपे यांची त्यांच्या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Alisha Khedekar

  • सांगलीतील पलूस येथे संचालकाची हत्या

  • अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये मृतदेह आढळला

  • मुलाने शोध घेतल्यावर घटना उघडकीस आली

  • पोलिसांकडून तपास सुरू

विजय पाटील, सांगली

Sangli Palus Pandit Vishnu Digambar Paluskar Educational Director Sanjay Paranjpe Murder सांगलीत एका नामांकित शिक्षण संस्थेच्या संचालकाची हत्या करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे संबंधित संचालकाची हत्या त्यांच्याच अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. संजय प्रभाकर परांजपे (६०) असं या मृत झालेल्या संचालकाच नाव आहे. याप्रकरणी पोलीस तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीतील पलूस येथील मारुती मंदिराजवळ संजय परांजपे यांचा जुना वाडा आहे. वाड्यालगतच त्यांचे नवीन गजानन सदन नावाचे अपार्टमेंट आहे. सायंकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान परांजपे मंदिरात दर्शनासाठी जातो असे सांगून बाहेर पडले. मात्र बराच वेळ झाला मंदिरात दर्शनासाठी गेलेले परांजपे आले नाहीत, म्हणून कुटुंबीयांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. तरीही त्यांचं काहीच उत्तर मिळालं नाही.

वडील घरी परतले नाहीत म्हणून संजय यांचा मुलगा मंदार त्यांना शोधण्यासाठी बाहेर पडला. अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये मंदारला रक्ताचा सडा दिसला. पुढे गेल्यानंतर त्याला वडील जखमी अवस्थेत पार्किंगमध्येच एका कोपऱ्यात आढळले. मंदारने घाबरून आरडाओरडा सुरु केला. काही क्षणातच आजूबाजूचे नागरिक घटनास्थळी जमा झाले. त्यांनी पलूस पोलिसांना घटनेची माहिती दिली.

पलूस पोलिसांनी पंचनामा केला. संजय परांजपे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आला. संजय परांजपे हे पंडित विष्णू दिगंबर पलूसकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उदय परांजपे यांचे धाकटे बंधू होते. या घटनेनंतर घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. परांजपे यांच्या हत्येने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Health Tips : जीमनंतर प्रोटीन पावडर खाल्ल्याने किडनीवर होऊ शकतो परिणाम, वेळेआधीच जाणून घ्या 'या' ६ गोष्टी नाहीतर....

Maharashtra News Live Update : चंद्रपुरात शिवसेनेची ताकद वाढवण्याचा निर्धार; उदय सामंतांच्या उपस्थितीत आढावा बैठक

Ind vs SL : भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्या कसोटीसाठी संघाची घोषणा, या खेळाडूंना मिळाली संधी

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्टला धावणार, रेल्वेमंत्र्यांनी दिली महत्त्वाची अपडेट

Face Care: फक्त ३ दिवसांत स्किन होईल सॉफ्ट आणि ग्लोईंग; आजच ट्राय करा 'हा' घरगुती फेसपॅक

SCROLL FOR NEXT