Sangli, Sangli Court, Sangli Police Saam Tv
महाराष्ट्र

Sangli News : संजय भाट खूनप्रकरणी अहिल्यानगरातील तिघांना जन्मठेप

न्यायालयात सुनावणी वेळे सरकारी पक्षातर्फे 15 साक्षीदार तपासले.

विजय पाटील

Sangli News : पूर्व वैमानस्यातून सांगली येथील अहिल्यानगर येथे संजय भाट याचा खून केल्याबद्दल संशयित आरोपी अशोक वसंत पाटील, प्रकाश उर्फ अण्णा बाबा गवळी, अमित प्रकाश कांबळे (सर्व राहणार अहिल्यानगर) यांना न्यायालयानं (court) जन्मठेपेची आणि प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील रियाज जमादार यांनी हा खटला चालवला.

अशोक पाटील याची पत्नी आणि मृत संजय भाट यांच्यात संबंध असल्याबद्दल पोलीस ठाण्यात तक्रार दहा वर्षांपूर्वी पाटीलने दिली होती. त्यावेळी ते प्रकरण पाटीलनं एक लाख रुपये घेऊन मिटवले होते. तेव्हापासून दोघेही एकमेकांशी बोलत नव्हते. संजय भाट याचा मित्र सुनील कोळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त अहिल्यानगर चौकात मोठे डिजिटल पोस्टर लावले होते.

त्यावर संजय भाट याचे छायाचित्र होते. 27 नोव्हेंबर 2015 रोजी संजय भाट यांच्या फोटोत गळ्याभोवती ब्लेडने फाडण्यात आले होते. अशोक पाटील याने पोस्टर फाडले या कारणावरून दुपारी भाट आणि अशोक पाटील यांच्यात भांडण झाले. त्याच दिवशी रात्री आठच्या सुमारास भाट आणि त्यांचा मित्र दुचाकी वरून अहिल्यानगर येथे आले. तेव्हा तेथे आलेल्या तिघांनी दुचाकीवरून भाटला खाली पाडून डोक्यात आणि मानेवर शरीरावर 24 ठिकाणी तलवार, कोयता, गुप्ती याने वार केले.

हल्ल्यानंतर भाट यांच्या बहिणीचा पती संजय कुमार पाटील घटनास्थळी आले. त्यांनी जखमी भाट यांना रिक्षा मधून घालून सिव्हिल हॉस्पिटलला नेत असताना भाट यांनी संजय कुमार व रिक्षांमधील शकील मुल्ला यांच्यासमोर तिघांनी तलवार कोयता व गुप्तीने वार केल्याची वस्तुस्थिती सांगितली.त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल जवळ पोहोचले असता भाट याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी संजय कुमार पाटील यांनी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. न्यायालयात सुनावणी वेळे सरकारी पक्षातर्फे 15 साक्षीदार तपासले. प्रत्ययदर्शी साक्षीदार विजय शिंदे आणि अनिल आवटे यांची साक्ष महत्त्वाची ठरली.

फिर्यादी संजय कुमार पाटील आणि शकील मुल्ला यांच्यासमोर झालेल्या मृत्यू पूर्व जबाब हा महत्त्वाचा पुरावा ठरला. सिव्हील हॉस्पिटलचे डॉक्टर यांची साक्षी महत्वाची ठरली. साक्ष आणि पुराव्याच्या आधारे न्यायालयानं तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

SCROLL FOR NEXT