sangli citizens opposed nagpur goa shaktipeeth expressway Saam Digital
महाराष्ट्र

Nagpur Goa Shaktipeeth Expressway: शक्तीपीठ महामार्गाला सांगलीकरांचा विराेध, अधिसूचनेची केली होळी

sangli citizens opposed nagpur goa shaktipeeth expressway: येत्या 18 जून रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चामध्ये सांगलीकरांनी माेठ्या संख्येेने सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

विजय पाटील

नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गा विरोधात आज (गुरुवार) सांगली येथे आंदोलन करण्यात आले. शेतकरी व सामाजिक संघटनांनी एकत्रित येत राज्य सरकारकडून शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन संपादित करण्यासाठी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेची होळी केली.

शक्तीपीठ महामार्गामुळे सांगली जिल्ह्यातील जवळपास 19 गावातील पाच हजारहून अधिक शेतकऱ्यांची जमीन बाधित होणार आहे. जवळपास बाराशे ते पंधराशे एकर जमीन शेतकऱ्यांची संपादित करण्यात येणार आहे. मात्र या महामार्गाची कोणत्याही परिस्थितीमध्ये आवश्यकता नसल्याचा दावा आंदाेलकांनी केला.

सांगली येथील कष्टकरी दौलत मध्ये या महामार्गाच्या विरोधात बैठक पार पडली. या बैठकीत सांगली जिल्ह्यातल्या सामाजिक संघटनांनी, शेतकऱ्यांनी एकत्रितरित्या शक्तिपीठ विरोधात लढा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship vs Friendship : रिलेशनशिप की फ्रेंडशिप कशात असतो जास्त फायदा?

Shocking: प्रसिद्ध इन्फ्लुएंसर अडकली होती वेश्याव्यवसायात; ६ वर्षानंतर अशी झाली सुटका; भयंकर अनुभव सांगताना म्हणाली...

Chhangur Baba : यूपीतील धर्मांतर करणाऱ्या छांगुर बाबाचे पुणे कनेक्शन; कोट्यवधींची मालमत्ता खरेदी करण्याची होती तयारी

Sawan 2025 Upay: उत्तरेतील श्रावणाचा आज पहिला दिवस; 'हे' उपाय करा भगवान शंकर होतील प्रसन्न

Maharashtra Live News Update : पंढरपूर पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT