sangli Breaking news two farmers died due to electric motor shock at atpadi village Saam TV
महाराष्ट्र

Sangli News: मोटार सोडायला तलावावर गेले, तिथेच अनर्थ घडला; दोन शेतकऱ्यांचा जागेवर मृत्यू

Sangli Farmers News: सांगली जिल्ह्यातील आटपाडीमध्ये दोन शेतकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

Satish Daud

Sangli Farmers News: सांगली जिल्ह्यातील आटपाडीमध्ये दोन शेतकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अनिकेत अमृत विभुते (रा. आटपाडी) आणि विलास मारुती गूळदगड (रा. पंढरपूर) अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत. या दुर्देवी घटनेमुळे आटपाडी तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आटपाडी तलावात (Sangli News) पाणी पातळी कमी झाल्याने दोन्ही शेतकरी शेतात विद्युत मोटार बसवण्यासाठी गेले होते. तलावाच्या पाण्यात मोटार सोडत असताना अचानक दोघांनाही विजेचा जोरदार शॉक लागला. या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला.

आटपाडी तलावातून शेतीसाठी अनेक शेतकऱ्यांनी (Farmers) शेतीसाठी पाइपलाइन करून पाण्याची सोय केली आहे. माडगूळे येथील सोमनाथ विभुते आणि मधुकर विभुते यांच्यासह ४ ते ५ जणांची सामुदायिक पाइपलाइन आहे. तलावातील पाणी साठा कमी झाल्याने विद्युत मोटर पुन्हा पाण्यात बसवावी लागत आहे.

दरम्यान, गुरूवारी दुपारच्या सुमारास अनिकेत विभुते हा पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील शेवते गावातून आलेल्या विलास गुळदगड आणि सखाराम पाटील या नातेवाइकांना घेऊन तलावावर गेला. सखाराम पाटील हे बांधावर थांबले.

तलावाच्या बांधावरून अनिकेत विभुते आणि विलास गुळदगड यांनी विद्युत मोटर पाण्यात ठेवली. यावेळी दोघांना अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. त्यामुळे दोघेही पाण्यात पडले. या घटनेत दोन्ही शेतकऱ्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनवरून परतत येताना घडली घटना

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

SCROLL FOR NEXT