Sangli News Saam Tv
महाराष्ट्र

Sangli Boat Race: कृष्णा नदीत रंगली होड्यांची शर्यत; थरार पाहण्यासाठी नागरिकांची तुफान गर्दी

Sangli Marathi News: पावसाळा सुरू झाला की सांगलीच्या कृष्णा नदी पात्रामध्ये होड्यांच्या शर्यतींचा थरार रंगत असतो.

विजय पाटील

Sangli News Today: सांगलीच्या मिरजेतील कृष्णा नदीत भव्य होडयांच्या शर्यती पार पडल्या आहेत. कृष्णा नदीमध्ये पार पडलेल्या या थरारक होडी शर्यतीमध्ये मिरज तालुक्यातल्या कवठेपिरान येथील सप्तर्षी बोट क्लबने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर या होड्याच्या शर्यती पाहण्यासाठी नागरिकांनी कृष्णा काठी एकच गर्दी केली होती. (Latest Marathi News)

पावसाळा सुरू झाला की सांगलीच्या (Sangli) कृष्णा नदी पात्रामध्ये होड्यांच्या शर्यतींचा थरार रंगत असतो. यंदाही पावसाळ्यात (Rain) कृष्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. या पार्श्वभूमीवर मिरजेच्या कृष्णा घाट या ठिकाणी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव सागर व्हनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने भव्य होड्यांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेमध्ये सांगली आणि कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातल्या 11 होडी स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीने आणि थरारक अशा पार पडलेल्या होडीच्या शर्यती पाहण्यासाठी कृष्णा काठावर हजारो नागरिकांनी गर्दी केली होती.

नदी पात्रात तीन किलोमीटर अंतराच्या चार फेरी मारण्याच्या शर्यतीत मिरज तालुक्यातल्या कवठेपिराने येथील सप्तर्षी बोट क्लबने पहिला क्रमांक पटकावला तर समडोळी बोट क्लबने दुसरा आणि तरुण मराठा बोट क्लब सांगलीवाडी यांनी तिसरा क्रमांक पटकावला आहे. या विजेत्या संघांना सांगली महापालिकेचे आयुक्त सुनील पवार व मान्यवरांच्या रोख रक्कम व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

Mangalsutra Design For Wedding: लग्नात घालण्यासाठी सुंदर मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update : कोल्हापूरमध्ये राज्य साखर कर्मचारी महासंघाचा एल्गार

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

SCROLL FOR NEXT