Sangli School Student Addiction saam tv
महाराष्ट्र

Sangli News: सांगलीचा झालाय 'उडता पंजाब'? सार्वजनिक उद्यानात विद्यार्थी नशेत धुंद

Sangli School Student Addiction: सांगलीतील शाळकरी मुलं नशेच्या विळख्यात अडकली आहेत. सोशल मीडियावर नशा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तेजल नागरे, साम प्रतिनिधी

पालकांनो, तुम्हाला तुमची मुलं काय करतायत ते माहितीय का? तुमचं त्यांच्याकडे लक्ष आहे का? आम्ही असं का म्हणतोय असा प्रश्न पडला असेल तर ही बातमी काळजीपूर्वक पाहा.शालेय मुलं नशेच्या विळख्यात अडकलीयेत. पाहुयात याच संदर्भातला स्पेशल रिपोर्ट.

सार्वजनिक उद्यान म्हणजे लहान मुलांचं खेळण्या-बागडण्याचं ठिकाणं. मात्र याच जागी शाळकरी मुलं चक्क नशेत धुंद असल्याचं दिसतंय. सांगली शहरातला एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. ज्या वयात हातात पुस्तक असतं त्या वयात या मुलांच्या हातात हुक्का दिसतोय. मुख्य म्हणजे ही मुलं लपून छपून नाही तर खुलेआम सार्वजनिक उद्यानात नशा करत असल्याचं दिसतंय.त्यामुळे सार्वजनिक स्वास्थ्य अबाधित राखण्याची जबाबदारी असणाऱ्या पोलिसांचे अशा घटनांकडे लक्ष आहे का की पोलिसाचं याला अभय आहे असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय.

देशाचं भवितव्य या चिमुकल्या हातात असतं.त्यामुळे या हातात या वयातच सर्रासपणे असे नशेचे पदार्थ दिसले तर त्यांच्या भविष्याचं काय. त्यामुळे आपली मुलं काय करतायत याकडे पालकांनी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणं जितकं गरजेचं आहे तेवढंच शिक्षकांनी विद्यार्थ्यामध्ये प्रबोधन करण्याची गरज आहे..हे अंमली पदार्थ इतक्या सहजपणे कसे उपलब्ध होतात याचा तपास करण्याची जबाबदारी पोलिस यंत्रणेची आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: स्वच्छ आणि ग्लोईंग त्वचेसाठी आठवड्यातून २ वेळा लावा घरी बनवलेला हा फेसपॅक

Mango Ice Cream : रात्री आईस्क्रीम खाण्याची खूप इच्छा होते, मग घरीच बनवा टेस्टी मँगो आईस्क्रीम

Summer Sunscreen Using Tips: सनस्क्रीन लावताना तुम्हीही 'या' चुका करताय का? जाणून घ्या उन्हाळ्यात सनस्क्रिन कशी लावायची?

LPG Shortage: गॅसचा तुटवडा; रेल्वेतील खाद्यसेवा बंद| VIDEO

Maharashtra Live News Update: गॅस दरवढीच्या विरोधात सोलापुरात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

SCROLL FOR NEXT