tuljapur  Saam tv
महाराष्ट्र

Tuljapur News : पवित्र तुळजापूरला ड्रग्जचा अड्डा बनवणारी संगीता कोण? पाहा स्पेशल रिपोर्ट

tuljapur news update : साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या पवित्र तुळजापूरला ड्रग्जचा अड्डा बनवणारी संगीता कोण? तुळजापूरपर्यंत ड्रग्ज कसं पोहचतं? पाहयात या स्पेशल रिपोर्टमध्ये....

Bharat Mohalkar

महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी... मात्र तुळजाभवानीच्या तुळजापूरला ड्रग्जचा विळखा पडलाय...तब्बल 3 वर्षापासून तुळजापूरात सुरु असलेल्या ड्रग्ज रॅकेटचं एक वेगळंच सिंडीकेट समोर आलंय...संगीता गोळे नावाच्या महिलेने तीन वर्षापासून तरुणांच्या आयुष्याला सुरुंग लावलाय.... तर फेब्रुवारीमध्ये पोलीसांनी संगीताच्या मुसक्या आवळल्यात....यावेळी संगीताची संपत्ती पाहून पोलीसही चक्रावून गेलेत... मात्र ही संगीता कोण आहे? पाहूयात...

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात संगीता गोळे मुख्य आरोपी

संगीता मुंबईत खासगी सुरक्षा एजेन्सीत काम करायची

संगीता, तिचा पती वैभव आणि दीर ड्रग्ज कार्टेलमध्ये सक्रीय

संगीताच्या खात्यात 5 कोटी, 25 तोळे सोनं, 4 कार, मुंबई आणि लोणावळ्यात मालमत्ता

संगीताची म्युच्युअल फंडमध्येही मोठी गुंतवणूक

संगीता आणि पिंटू मुळेच्या भेटीनंतर ड्रग्ज रॅकेट फोफावलं

3 वर्षापासून तुळजापूरात ड्रग्जचा गोऱखधंदा सुरुय... तुळजापूरला नशेचा अड्डा बनवण्याचं काम सुरुय.. या प्रकरणात 35 आरोपी आढळून आलेत... त्यापैकी 14 आरोपींच्या मुसक्या आवळल्यात तर 21 आरोपी फरार आहेत...मात्र मुंबईतून तुळजापूरपर्यंत ड्रग्जचा प्रवास कसा व्हायचा? पाहूया...

मुंबईतून सोलापूरमार्गे ड्रग्ज तुळजापूरात दाखल

2500 रुपये ग्रॅमच्या पुडीची तीन भागात विभागणी

एका पुडीची 3 हजारांना विक्री

क्रिस्टल आणि पावडर अशा पद्धतीने ड्रग्जची विक्री

तुळजापूरमधीलहॉटेलमधून ड्रग्ज रॅकेट सुरू

याच तुळजाभवानीच्या तुळजापूरात दीड हजार तरुण ड्रग्जचे शिकार ठरलेत....

तुळजापूर या पवित्र तीर्थक्षेत्राला ड्रग्जचा अड्डा बनवून बदनाम केलं जातंय... हेच ड्रग्ज मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत पोहचलंय.. त्यामुळे संगीताच नाही तर राजकीय पुढारी आणि मंदिरातील पुजारी यांच्या सहभागाने सुरु असलेलं ड्रग्ज रॅकेट उध्वस्त करुन तुळजाभवानीच्या तुळजापूरला ड्रग्जपूर बनण्यापासून रोखायला हवं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT