Mendhavan Soldier Ramdas Badhe last rites  Saam Tv News
महाराष्ट्र

Ramdas Badhe : पुष्पचक्र अर्पण करताना लेकाकडून 'जय हिंद'चा नारा, शहीद जवान रामदास बढे अनंतात विलीन; अख्ख्या गावाला रडू कोसळलं

Sangamner Jawan Ramdas Bhade Funeral : संगमनेर तालुक्यातील मेंढवन या छोट्याशा गावातील रामदास बढे हे गेल्या २४ वर्षांपासून भारतीय सैन्यदलात कार्यरत होते. दोन महिन्यानंतर ते सेवानिवृत्त देखील होणार होते.

Prashant Patil

सचिन बनसोडे, साम टीव्ही

अहिल्यानगर : जम्मू काश्मीरमधील तंगदार सेक्टरमध्ये देश सेवेचे कर्तव्य बजावत असताना अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपुत्राला वीरमरण आलंय. संगमनेर तालुक्यातील मेंढवण गावचे रामदास बढे हे गेल्या २४ वर्षांपासून सैन्यदलात हवालदार म्हणून कार्यरत होते. रामदास बढे यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले असता पुष्पचक्र अर्पण करत त्यांच्या मुलाने जय हिंदचा नारा देत आपल्या वडिलांना अखेरचा निरोप दिला. हा क्षण उपस्थितांना आणखी भावूक करून गेला.

संगमनेर तालुक्यातील मेंढवन या छोट्याशा गावातील रामदास बढे हे गेल्या २४ वर्षांपासून भारतीय सैन्यदलात कार्यरत होते. दोन महिन्यानंतर ते सेवानिवृत्त देखील होणार होते. मात्र, त्याआधीच काळाने घाला घातला आणि जम्मू काश्मीरमधील तंगदार सेक्टरमध्ये कर्तव्य बजावत असताना रामदास बढे देशासाठी शहीद झाले. मेंढवण या त्यांच्या मूळगावी पार्थिव आल्यानंतर गावकऱ्यांनी गावातून मिरवणूक काढत अमर रहेच्या घोषणा दिल्या. काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहिली. यानंतर कुटुंबीयांनी देखील पुष्पचक्र अर्पण करत मानवंदना दिली.

यावेळी रामदास बढे यांच्या मुलाने पुष्पचक्र अर्पण करताना जय हिंदचा नारा देत आपल्या वडिलांना अखेरचा निरोप दिला. त्यावेळी उपस्थितांचे सर्व नातेवाईकांचे अश्रू अनावर झाले. सैन्यदल तसेच पोलीस दलाच्या वतीने यावेळी मानवंदना देण्यात आली. यानंतर अत्यंत शोकाकुल वातावरणात रामदास बढे यांना अखेरचा निरोप देण्यात आला. दरम्यान, अत्यंत गरिबीच्या परिस्थिती झगडत बढे सैन्य दलात दाखल झाले होते. त्यांच्या मृत्यूने मेंढवणसह संगमनेर तालुक्यात शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT