Sanjay Raut Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Raut : विशाल पाटलांचे विमान गुजरातला उतरवणार; संजय राऊतांचा विश्वजित कदमांवर अप्रत्यक्ष निशाणा

Sanjay Raut On Vishwajeet Kadam : विमान नागपूरला उतरणार नाही ते गुजरातला उतरेल, अशा शब्दात संजय राऊतांनी विश्वजीत कदम आणि विशाल पाटलांच्या भूमिकेबाबत नाव न घेता अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

साम टिव्ही ब्युरो

विजय पाटील

Sangali News :

सांगलीच्या जागेवरून खासदार संजय राऊत आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी आता थेट विश्वजीत कदम आणि विशाल पाटलांवर निशाणा साधालाय. विशाल पाटील भाजपात जातील असे भाकित देखील संजय राउतांनी केले आहे.

विशाल पाटलांचा पायलट कोणीतरी आहे आणि त्यांना पायलट जिथे नेईल तिथे विशाल पाटील जात आहेत. त्यामुळे विमान गुजरातच्या दिशेने जाऊ नये, त्याची आम्हाला चिंता आहे. अनेकदा विमान भरकटतात आणि विमान गुजरातला उतरू शकतात. विमान नागपूरला उतरणार नाही ते गुजरातला उतरेल, अशा शब्दात संजय राऊतांनी विश्वजीत कदम आणि विशाल पाटलांच्या भूमिकेबाबत नाव न घेता अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवर आपली चर्चा झाली आहे. त्यामुळे सांगलीची जागा शिवसेना लढवणार,असं देखील संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीतील निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे, असं म्हटलं होतं. त्यांच्या या विधानाचा पुनरुच्चार करत बारामतीची लढाई ही नरेंद्र मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे आणि शरद पवार अशी आहे. यामध्ये नरेंद्र मोदींचा पराभव होईल. पण देवेंद्र फडणवीस अंधारात चाचपडत आहेत,अशी टीका राऊत यांनी केली आहे.

या पार्श्वभूमीवर सांगलीतील विश्वजित कदम, इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी दिल्लीत वरिष्ठांशी भेट घेतली आहे. त्यानंतर विशाल पाटील यांनी सांगलीतील जनतेला एक पत्र लिहिलं आहे. 'सांगली काँग्रेसचीच असून काँग्रेसचीच राहणार, असा दावा देखील विशाल पाटील यांनी पत्रातून केला आहे. त्यावरून संजय राऊतांनी विशाल पाटीलांसह विश्वजित कदम भाजपमध्ये जाणार असा आरोप केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anger damages Heart: तणावापेक्षा धोकादायक राग! केवळ ८ मिनिटांचा राग वाढवतोय हार्ट अटॅकचा धोका

Maharashtra Live News Update: आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरूवात

Filmmaker Death : प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचं निधन, घरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, बॉलिवूडवर शोककळा

ज्येष्ठ खासदाराचे दुर्दैवी निधन, फुटबॉल खेळताना मैदानातच कोसळले, देशावर शोककळा!

Todays Horoscope: आज या राशींनी ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT