Yavatmal Crime : रात्रीच्या अंधारात चोरट्यांची घरात एन्ट्री; चाकूचा धाक दाखवत ९ लाखांचा ऐवज लंपास

Yavatmal Crime News : डोळे उघडताच त्यांनी पाहिले की, पाच अज्ञात दरोडेखोर तोंडाला रुमाल बांधलेल्‍या अवस्‍थेत दिसले. दरोडेखोरांनी चाकुचा धाक दाखवत त्‍यांना गप्‍प राहण्‍यास सांगतले.
crime
crimeSaam tv

Crime News :

यवतमाळच्या वन शहरातील पटवारी कॉलनीमध्‍ये चोरीची मोठी घटना घडली आहे. धारदार चाकुच्‍या धाकावर घरातील तिघांना बंदी करत तब्‍बल आठ लाख 50 हजाराचे सुवर्णलंकार व 44 हजाराची रोकड लंपास केली आहे. घटनेचा थरार घराजवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

crime
Shirpur Crime News : बहिणीला पळवून नेल्याचा संशय; तरुणाच्या भावाला जीवे मारण्याचा प्रयत्न

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सुभाष वासुदेव पिदूरकर हे लालगुडा परिसरातील पटवारी कॉलनी येथे आपल्‍या परिवारांसह वास्‍तव्‍यास आहेत. घटनेच्‍या दिवशी ते पत्‍नी आणि मुलींसह घरात झोपलेले होते. पहाटे तीन वाजताच्‍या दरम्‍यान घराचा दरवाजा तोडण्‍याचा आवाज आल्‍याने त्यांना जाग आली.

डोळे उघडताच त्यांनी पाहिले की, पाच अज्ञात दरोडेखोर तोंडाला रुमाल बांधलेल्‍या अवस्‍थेत दिसले. दरोडेखोरांनी चाकुचा धाक दाखवत त्‍यांना गप्‍प राहण्‍यास सांगतले. तसेच घरामध्ये दागिने आणि रोख रक्कम कुठे आहे याबाबत विचारले. घाबरलेल्‍या अवस्‍थेत असलेल्‍या कुटूंबियांनी रोख रक्कम तसेच सुवर्णालंकार ज्या ठिकाणी सुरक्षीत ठेवले होते ती जागा दाखवली.

त्यानंतर चोरट्यांनी 8 लाख 50 हजार रुपयांचे दागीने आणि 44 हजार रुपयांची रोकड घेवून पोबारा केला. पळून जाताना झालेल्या चोरीबद्दल कुणाला काही सांगितल्यास चाकूचा धाक दाखवला. अशा पद्धतीने तिने 9 लाखांचा ऐवज लंपास केला.

उल्हासगरमध्ये कॅम्प क्रमांक दोनमध्ये चोरी

उल्हासनगर कॅम्प क्रमांक दोन भागातील नेहरू चौकात देखील चोरीची मोठी घटना घडली आहे. नेहरू चौकात असलेल्या गजानंद मार्केट जवळील बिशन प्लाझा येथील व्यापारी दयाल जग्यासी यांच्या दुकानाचे कुलूप तोडून चोरी झाल्याये. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतलीये. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

crime
Chalisgaon Crime : चाळीसगाव हादरले; विवाहितेची हत्या करून नदीच्या वाळूत पुरले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com