Lingayat Community Demand Kunbi Certificate Saam Digital
महाराष्ट्र

Lingayat Community Demand Kunbi Certificate: आम्हीही शेतकरीच...आम्हाला पण कुणबी प्रमाणपत्र द्या, आता या समाजाने केली मागणी

Lingayat Community Demand Kunbi Certificate: आमच्या नावावर शेती आहे. आम्ही पूर्वापर शेती करतो. त्यामुळे आम्हीदेखील कुणबीच आहोत. आम्हालाही कुणबी प्रमाणपत्र द्या," अशी मागणी सकल लिंगायत मोर्चाने केली आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Lingayat Community Demand Kunbi Certificate

आमच्या नावावर शेती आहे. आम्ही पूर्वापर शेती करतो. त्यामुळे आम्हीदेखील कुणबीच आहोत. आम्हालाही कुणबी प्रमाणपत्र द्या," अशी मागणी सकल लिंगायत मोर्चाने केली आहे.. लिंगायत समाजाने सांगली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे. कुणबी प्रमाणपत्रासाठी लिंगायत समाजही आग्रही झाल्याने शासनाची कोंडी होण्याची शक्यता आहे.

लिंगायत समाज कष्टकरी असून शेकडो वर्षांपासून शेती करत आहे. त्यामुळे आमचा समावेश इतर मागास प्रवर्गात करावा. लिंगायत समाजातील सर्वच समाजघटकांना इतर मागास प्रवर्गात समाविष्ट करण्यात आलेले नाही. मात्र ते पिढ्यानपिढ्या शेती करत असल्याने कुणबी प्रवर्गासाठी पात्र आहेत. त्यांचा सरसकट समावेश कुणबी म्हणून इतर मागास प्रवर्गात करावा. शासनाच्या अभिलेखात तसा उल्लेख नसल्याने इतर मागास दाखले मिळत नाहीत.. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा फायदा घेता येत नाही.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शासनातर्फे सध्या मराठा कुणबी नोंदींची शोध मोहीम सुरू आहे. त्यावेळी लिंगायत कुणबी, कुणबी लिंगायत, कुणबी माळी, तेली कुणबी, कुंभार कुणबी, सुतार कुणबी, कोळी कुणबी, साळी कुणबी, लोहार कुणबी अशा नोंदीही सापडत आहेत. त्यामुळे हे सर्व समाजघटक कुणबी प्रमाणपत्रासाठी आणि पर्यायाने इतर मागास प्रवर्गासाठी पात्र आहेत. त्यांचा सरसकट समावेश इतर मागास प्रवर्गात करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी लिंगायत समाजाचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान मराठा समाजापाठोपाठ लिंगायत समाजानेही कुणबी प्रमाणपत्राची मागणी केल्यामुळे सरकारची कोंडी होण्याची शक्यता आहे. या सर्व परिस्थित सरकार काय निर्णय घेतं, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MCA awards ceremony: MCA अवॉर्ड्समध्ये शार्दुल-सिद्धेशचा दबदबा, आयुष म्हात्रेसह वर्ल्ड कप स्टार्सचा सन्मान

Maharashtra News Live Update: पुणे-सातारा महामार्गावरील चेलाडी पुलाखालील अतिक्रमणांवर NHAI कडून धडक कारवाई

Nagpur : अति व्यायामामुळे फाटली मेंदूतील रक्तवाहिनी; गोल्डन अवरमध्ये चमत्कार घडला, डॉक्टरांनी वाचवला तरुणाचा जीव

Marathi compulsory: मराठी शिकायचीच नसेल तर निघा; मराठमोळ्या गायकाचा परप्रांतियांना स्पष्ट शब्दात सल्ला

Young Age Heart Attack Reason: प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका सिरोहीचं हॉर्ट अटॅकमुळे मृत्यू, कमी वयात हार्ट अटॅक येण्याची नेमकी कारणे काय?

SCROLL FOR NEXT