Jat Crime News Saam tv
महाराष्ट्र

Sangali Crime News: जत तालुका हादरला! 32 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; १५ दिवसांतील आठवी घटना

Crime News: पंधरा दिवसात निर्घृण हत्येची आठवी घटना घडल्याने जत तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

Jat Crime News: सांगलीच्या जतमध्ये खुनाची मलिका सुरूच आहे. 15 दिवसांपूर्वी एक हत्या झाल्याचे समोर आले होते. ही घटना ताजी असतानाच आणखी एकाची निर्घृण हत्या झाल्याचा प्रकार घडला आहे. जत शहरा पासून काही अंतरावर असलेल्या यल्लमा रोडजवळ एका तरुणाची गळा चिरुन आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.. (Latest Marathi News)

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, शशिकांत बिरा मदने (वय 28) असे मृत तरुणाचे नाव असून घरापासून काही अंतरावर शेतात रक्ताच्या थारोळ्यात त्याचा मृतदेह आढळून आला. सकाळी हा खुनाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर जत शहरात एकचं खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच जत पोलिसांनी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवून दिला आहे..शशिकांत मदने हा ट्रॅक्टर चालक असून, या खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जत शहरात मोठ्या हत्येच्या घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी कोसारी येथे दोघा जणांची हत्या झाली होती. त्या पाठोपाठ जत शहरामध्ये भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांच्या खुनाची घटना घडली होती. यानंतर आता आणखी एका तरुणाची निर्घृण हत्येची घटना घडल्याने जत तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: रत्नागिरी जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची संततधार

Mumbai University Exam: मुंबई विद्यापीठाच्या 32 परीक्षा पुढे ढकलल्या; या तारखेला घेण्यात येणार | VIDEO

Maharashtra Rain Alert: पुढचे २४ तास महत्त्वाचे! मुंबई, ठाणे, रायगडला रेड अलर्ट; गरज असेल तरच बाहेर पडा

School Holiday Today: पावसाची जोरदार बॅटिंग; मुंबई, ठाण्यासह 'या' ठिकाणी शाळांना सुट्टी; वाचा सविस्तर

Horoscope: घरात येईल सुख-समृद्धि; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस ठरेल लाभकारी, जाणून घ्या राशीभविष्य

SCROLL FOR NEXT