Bhandara News Saam Tv
महाराष्ट्र

भंडाऱ्यात वाळू तस्करांचा एसडीओंच्या पथकावर हल्ला, एसडीओ जखमी

ही घटना बुधवारी पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास घडली.

अभिजीत घोरमारे

भंडारा - कारवाईसाठी गेलेल्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या (एसडीओ) पथकावर वाळू तस्करांनी हल्ला केल्याची घटना भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील बेटाळा घडली आहे. ही घटना बुधवारी पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास घडली असल्याची माहिती समोर आली आहे. यात एसडीओ जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात (Hospital) उपचार सुरु आहेत. वाहनाच्या काचाही फोडण्यात आल्या आहे. या प्रकरणी पवनी ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

हे देखील पाहा -

भंडाराचे उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड यांच्याकडे वाळू तस्करीच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यावरुन बुधवारी पहाटे ते तलाठी, पोलीस कर्मचारी असलेल्या पथकासह पवनी निलज रस्त्यावर वाहनाने गेले. पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास वाळूचे चार-पाच टिप्पर एकापाठोपाठ येताना दिसले असता टिप्परला थांबविण्याचा इशारा केला. त्यावेळी त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र काही अंतरावर बेटाळाजवळ टिप्पर अडविला गेला. 15 ते 20 तस्करांनी हातात काठ्या व दगड घेऊन हल्ला केला. यात उपविभागीय अधिकारी राठोड जखमी झाले.

या प्रकाराची माहिती पवनी पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले मात्र तोपर्यंत तस्कर पसार झाले होते. त्यानंतर पवनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान, पालांदूर परिसरात दोन दिवसांपूर्वी तहसीलदारांच्या पथकांवर वाळू तस्कारांनी लाठ्याकाठ्या घेऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यात दोन तस्करांना अटकही करण्यात आली होती. आता थेट एसडीओंच्या पथकावर हल्ला करण्यात आल्याने या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

Maharashtra News Live Updates: विधानसभा निवडणूक प्रचारासाठी प्रियंका गांधी येणार कोल्हापुरात

PM Modi Speech : सरकारी योजनांवरून पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल, VIDEO

एक नंबर! आता कॉलसाठी नसणार SIMची गरज; भारतात पहिल्यांदा Satellite to Device सर्विस सुरू

रणबीर कपूरचे हे ७ चित्रपट बॉक्स ऑफिसवर घालणार धुमाकूळ, यादीच आली समोर

SCROLL FOR NEXT