औरंगाबादेत हवाला रॅकेटवर छापा; कोटींची बेहिशोबी रक्कम जप्त

किराणा दुकानातून चालू होता हवाला
Aurangabad Crime News in Marathi, Aurangabad latest Marathi news
Aurangabad Crime News in Marathi, Aurangabad latest Marathi news Saam Tv
Published On

औरंगाबाद - शहरातील हवाला रॅकेट चालकावर गुन्हे शाखा पोलिसांनी (Police) मंगळवारी रात्री उशिरा छापा मारला, यात एक कोटी ९ लाख ५० हजार रूपये बेहिशोबी रक्कम पोलिसांच्या हाती लागली आहे. औरंगाबाद (Aurangabad) शहरातील शहागंज भागातील चेलिपुरा येथील सुरेश राईस किराणा दुकानातून हा संपूर्ण हवालाचा कारभार चालत होता़ या प्रकरणी आरोपी आशीष सावजी याता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इनकम टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्याच्या उपस्थितीत या बेहिशोबी रक्कम मोजण्यात येत आहेत. (Aurangabad Crime News in Marathi)

याबाबत सिटीचौक पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. शहागंज परिसरातील चेलिपुरा येथे एका किराणा दुकानातून हवाला चालविला जात असून दररोज कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. यावरून सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे, पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कल्याण शेळके आणि त्यांच्या टीमने जावून सुरेश राईस किराणा दुकानाच्या आज-बाजूला रेकी केली.

हे देखील पाहा-

त्याठिकाणी दिवसभर अनेक लोक येताना व जाताना दिसले. लोक किराणा दुकानात येऊन किराणा न घेताच रिकाम्या हाताने बाहेर पडताना टीमला दिसले. खबऱ्याकडून मिळालेली माहिती योग्य असल्याची खात्री झाली. यावर सायंकाळच्या सुमारास गुन्हे शाखेच्या टीमने छापा टाकला. यावेळी किराणा दुकान आणि त्या मागे असलेल्या पार्टेशनमध्ये शोध मोहीम राबविली. यावेळी आतील काऊंटरवर आणि काही फरशीवर पैशांचे बंडल रचून ठेवलेले होते.

या पैशांचा हिशोबा विचारणा केली असता किराणा दुकानदार आशीष सावजी यांना काहीच सांगत आले नाही. किराणा दुकानाच्या नावाखाली हवालाचा पैसा असल्याचा संशय पक्का झाल्याने आरोपी सावजी याला सिटीचौक पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याठिकाणी इनकम टॅक्स विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना बोलविण्यात आले. रात्री उशीरापर्यंत पैसे मोजण्यात आले़ तब्बल १ कोटी ९ लाख ५० हजार रूपये याठिकाणी मिळाले आहे़. आरोपी आशीष सावजी याच्या विरूद्ध रात्री उशीरापर्यंत सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com