Sana Khan Case Updates nagpur police got Big information from DNA report Saam TV
महाराष्ट्र

Sana Khan Case Updates: सना खान हत्या प्रकरणात मोठी अपडेट; पोलिसांना सापडला सर्वात मोठा पुरावा

Sana Khan Case Updates: सना खानच्या मृत्यूचे गुढ वाढत असताना आता पोलिसांना एक मोठा पुरावा सापडला आहे.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Sana Khan Murder Case Updates: भाजप अल्पसंख्याक आघाडीच्या पदाधिकारी सना खान हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. सना खानच्या मृत्यूचे गुढ वाढत असताना आता पोलिसांना एक मोठा पुरावा सापडला आहे. आरोपी अमित साहूच्या कारमधील आणि घरातील सोफ्यामध्ये सापडलेले रक्ताचे डाग हे सना खानचेच असल्याचं तपासात उघड झालं आहे. (Latest Marathi News)

नागपूरच्या (Nagpur) फॉरेन्सिक लॅबमधील तज्ञांनी त्या संदर्भातील गोपनीय अहवाल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सोपवल्याची माहिती आहे. भाजप पदाधिकारी सना खान यांची काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशात हत्या करण्यात आली होती. सना खानचा पती अमित साहूने ही हत्या केल्याचा आरोप सनाच्या आईने केला होता.

जबलपूरमधील ज्या घरी सना खानची (Sana Khan) हत्या झाली, तिथल्या सोफ्याच्या फोम मध्ये सुकलेल्या अवस्थेत रक्ताचे डाग आढळले होते. ज्या लाकडी दांडुक्याने अमित साहूने सना खानची हत्या केली. त्यालाही रक्ताचे डाग लागले होते. याशिवाय अमित साहूच्या कारमध्येही पोलिसांना रक्ताचे पुरावे सापडले होते.

दरम्यान, पोलिसांनी (Police) हे पुरावे डीएनए चाचणीसाठी पाठवले होते. आता डीएनए चाचणीचा अहवाल समोर आला असून आरोपी अमित शाहू यांच्या कारमधील रक्ताचे डाग आणि सनाच्या आईच्या रक्ताचे डीएनए जुळले असल्याची माहिती आहे.

सना खान यांचा मृतदेह पोलिसांना अद्यापही सापडला नाही. आरोपी अमित साहू हा वारंवार वेगवेगळी उत्तरे देऊन पोलिसांची दिशाभूल करीत आहे. त्यामुळे डीएनए रिपोर्ट हा मोठा पुरावा ठरणार आहे. याशिवाय अमित साहू याच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने सुद्धा सना खान यांचा मृतदेह बघितला होता. तो जबाब देखील पोलिसांठी महत्वाचा ठरणार आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडला बेवारस मृतदेह

तीन मच्छीमारांकडून विधवा महिलेवर आळीपाळीनं बलात्कार; घरी नेत पुन्हा अब्रूचे लचके तोडले

Hardik Pandya: हार्दिक पांड्यासोबत दिसणारी 'ही' अभिनेत्री कोण? 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटात साकारली होती खास भूमिका

Navi Mumbai Metro: वाशीमधून मेट्रो धावणार! मुंबई एअरपोर्ट आणि नवी मुंबई एअरपोर्ट झटक्यात गाठता येणार

Life expectancy with a single kidney: व्यक्ती एका किडनीवर किती जगता येतं? जाणून घ्या काय काळजी घ्यावी लागते?

SCROLL FOR NEXT