Samruddhi Mahamarg Vidarbha Travels Accident Accident CM Eknath Shinde Reaction एोोस ऊ
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg Accident: विदर्भ ट्रॅव्हल्स अपघाताची चौकशी होणार, मुख्यमंत्र्यांकडून मृतांना ५ लाखांची मदत जाहीर

Samruddhi Mahamarg Accident CM Eknath Shinde Reaction: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून मृतांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली आहे.

Satish Daud

Samruddhi Mahamarg Accident CM Eknath Shinde Reaction: बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सचा शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. टायर फुटल्याने बस अनियंत्रित होऊन डिव्हायरला धडकली, अचानक डिझेलच्या टाकीने पेट घेतल्याने या अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. तर ८ प्रवाशी जखमी झाले आहेत.

समृद्धी महामार्गावरुन (Samruddhi Mahamarg Accident) ही बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने निघाली होती. जखमी प्रवाशांना बुलढाणा येथील सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आलं आहे. या घटनेनं मोठी हळहळ व्यक्त होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून मृतांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली आहे.

त्याचबरोबर या अपघाताची चौकशी करण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. साम टीव्हीसोबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, घडलेली घटना अत्यंत दुर्देवी आहे. मी याबाबत पोलिस अधिकाऱ्यांसोबत बोललो आहे. या अपघाताची चौकशी होणार, जखमींवर तातडीच्या उपचार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मृतांची ओळख पटवणे सुरू असून प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर करतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

अपघात नेमका कसा झाला?

दरम्यान, बस चालकासह बसमधील ८ प्रवाशी सुखरूप बचावले आहेत. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत बसचालकाने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भ ट्रॅव्हल्सची खासगी बस ३० जून रोजी सायंकाळी ५ वाजता नागपूर वरून पुण्याच्या दिशेने जात होती.

१ जुलैच्या रात्री दीड वाजेच्या सुमारास बस बुलढाणा (Buldhana Accident News) येथील सिंदखेडराजा परिसरात आली. बसचा वेग जास्त असल्याने समोरील टायर फुटले. त्यामुळे बस थेट दुभाजकाला धडकली. क्षणार्धात बसने पेट घेतला. बस दरवाजाच्या दिशेने उलटल्याने बसमधून प्रवाशांना बाहेर पडता आले नाही.

काही प्रवाशांनी खिडकीच्या काचा फोडून बाहेर उड्या घेतल्या. मात्र, गाढ झोपेत असलेल्या प्रवाशांना बाहेर पडता आलं नाही. त्यामुळे २५ प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला.  या अपघातात चालकासह ८ जणांचे प्राण वाचले. या भयानक घटनेमुळे मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bollywood : तिने अभिताभ बच्चनशी संबंध... विवाहबाह्य संबंधांवर रेखा यांचे वडील काय म्हणाले?

Maharashtra Rain Live News: पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी

ठाणे, दादर रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तोबा गर्दी, VIDEO

Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर कंटेनर उलटला; रस्ता ब्लॉक, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Mumbai Vada Pav : मुंबईच्या वडापावला मिळाला दक्षिण भारतीय ट्विस्ट! नवा फ्युजन फ्लेवर सोशल मीडियावर चर्चेत

SCROLL FOR NEXT