Marriage Broke Up Shocking News: लग्न म्हटलं की गडबड गोंधळ आलाच. लग्नाचा दिवस हा प्रत्येकासाठी खास आणि आनंदाचा असतो. अनेकजण या दिवसाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. सध्या भारतात लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे लग्नसमारंभातील अनेक बातम्या कानावर येत आहेत. कुठे लग्नात फसवणूक होतेय, तर कुठे लग्न मोडल्याच्या घटना समोर येत आहेत. असंच काहीसं प्रकरण बिहारमधून समोर आलं आहे.
नालंदा जिल्ह्यात एका तरुणीचं शेजारील गावच्या तरुणासोबत लग्न (Marriage) जमलं होतं. लग्नाच्या दिवशी कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. ठरल्याप्रमाणे वाजत गाजत वरात आली. वऱ्हाडी मंडळी मंडपात जमली. नवरीचं मंडपात आगमन झालं. आता बुवा मंगलाअष्टक सुरू करणार इतक्यात नवरीने नवरदेवाकडे बघितलं.
नवरदेवाचा चेहरा पाहून नवरीला (Bride) मोठा धक्काच बसला. मला हे लग्न करायचं नाही, म्हणून ती मंडपातून उठून एका खोलीत निघून गेली. नवरीच्या या कृत्याने मंडपात मोठा गोंधळ उडाला. कुटुंबियांनी तिला विचारणा केली असता, ज्याच्यासोबत लग्न ठरलं होतं तो हा मुलगा नाहीये, असं म्हणत तिने लग्नास नकार दिला.
दरम्यान, वधूकडील कुटुंबियांनी नवरदेवाचा (Groom) चेहरा बघितला. हा नवरदेव नसून त्याचा चुलत भाऊ असल्याची त्यांनाही खात्री पटली. मग काय वधूकडील मंडळींनी नवरदेवासह वऱ्हाडी मंडळींना मारहाण करण्यास सुरूवात केली. गावातील इतर लोकांनी नवरदेव आणि वरातातील पाहुण्यांना वाचवलं.
दरम्यान, या संपूर्ण प्रकाराची माहिती कुणीतरी स्थानिक पोलिसांना (Police) दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नवरदेवासह वरातीतील सगळ्या लोकांना पोलीस ठाण्यात घेऊन आले. तेव्हा समजलं, की नवरदेव म्हणून आलेला तरुण वेगळाच होता. तरुणीचं ज्या व्यक्तीसोबत लग्न ठरलं होतं, तो हा नव्हताच. त्याच्या जागी त्याचा चुलत भाऊ नवरदेव बनून आला होता.
ज्या तरुणासोबत मुलीचं लग्न ठरलं होतं, तो तरुण लग्नाच्याच दिवशी घरातून पळून गेल्याचं समोर आलं आहे. त्याचं दुसऱ्याच मुलीवर प्रेम होतं. त्याने पळून जाऊन लग्न केलं. अशा स्थितीत मुलीकडील मंडळींची कोंडी होऊ नये म्हणून तरुणाच्या कुटुंबियांनी त्याच्या चुलत भावाला नवरीशी लग्न करण्यासाठी तयार केलं होतं. पण त्यांच बिंग फुटलं आणि प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत पोहचलं.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.