Samruddhi Mahamarg Traffic Jam Saam Tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर ट्रक आडवा लावून चालक पसार, २ तास वाहतूक कोंडी; प्रवासी हैराण, पाहा VIDEO

Wardha News: समृद्धी महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. ट्रक चालकाने आरटीओसोबत वाद झाल्यानंतर महामार्गावर ट्रक आडवा लावून पसार झाला.

Priya More
  • समृद्धी महामार्गावर ट्रक आडवा लावून चालक पसार

  • आरटीओसोबत वाद झाल्यानंतर ट्रक चालकाने महामार्ग रोखला

  • समृद्धी महामार्गावर दोन तास वाहतूक कोंडी

  • नागपूर -मुंबई समृद्धी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

समृद्धी महामार्गावर ट्रक आडवा लावून चालक चावी घेऊन पसार झाल्याची घटना घडली होती. यामुळे समृद्धी महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अखेर २ तासांच्या प्रयत्नांनंतर महामार्ग पोलिसांनी ट्रक बाजूला करून ही वाहतूक कोंडी सुरळीत केली. आरटीओने चालन केल्याने ट्रक चालकाने भर रस्त्यात ट्रक आडवा लावला होता आणि चावी काढून त्याने घटनास्थळावरून पळ काढला होता. यामुळे समृद्धी महामार्गावर वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या.

समृद्धी महामार्गाच्या चॅनल नंबर ५० जवळ ट्रक आडवा करून चालक चावी घेऊन पळून गेला होता. ट्रक आडवा लावल्याने नागपूर- मुंबई मार्गांवरील मोठी वाहतूक कोंडी झाली होती. आरटीओसोबत वाद झाल्यामुळे ट्रक चालक संतप्त झाला होता. या रागाच्या भरात त्याने ट्रक महामार्गावर आडवा लावून पळून गेला होता अशी प्राथमिक माहिती समोर आली. समृद्धी महामार्गावर घडलेल्या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिस उपनिरीक्षक चौधरी आणि त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली होती.

२ तासांपासून ट्रक आडवा लावल्याने नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाला होता. महामार्गांवर ला.बच लांब रांगा लागल्या होत्या. महामार्ग आणि सांगवी पोलिसांनी बऱ्याच तासांच्या प्रयत्नांनंतर ट्रक हटवत सावंगी जप्त केला. सावंगी पोलिसात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. हा ट्रक चालक हरियाणा येथून आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात डीजेवरून राजकारण तापलं; DJ मुक्त पुण्याला गणेश मंडळांचाच विरोध

Maharashtra News Live Update: आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन अखेर मागे

Mumbai: दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; चौघांना अटक, ८ चोरीच्या बाईक जप्त

जात पडताळणी समित्य़ा रद्द करा, जरांगेंनी पुन्हा एकदा रणशिंग फुकलं!

समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; चोरीचा थरार डॅश कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT