Samruddhi Mahamarg Toll Hike Saam Tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर प्रवास महागणार, टोलदरात मोठी वाढ; कोणत्या वाहनांसाठी किती पैसे मोजावे लागणार?

Samruddhi Mahamarg Toll Hike: समृद्धी महामार्गावरील प्रवास आणखी महागणार आहे. कारण समृद्धी महामार्गावर टोलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. १ एप्रिलपासून नवीन दरवाढ लागू होणार आहे.

Priya More

पराग ढोबळे, नागपूर

समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. या महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. कारण समृद्धी महामार्गावर टोलवाढ होणार आहे. टोलसाठी १९ टक्क्यांहून अधिक पैसे भरावे लागणार आहेत. १ एप्रिलपासून ही टोलवाढ होणार आहे.

नागपूर ते मुंबई या ७०१ किलोमीटर अंतरापैकी नागपूर ते इगतपुरी हा ६२५ किलोमीटरचा मार्ग सुरू झाला आहे. येत्या महिनाभरात इगतपुरी ते आमने हा उर्वरित ७६ किलोमीटरचा मार्ग सेवेत दाखल होणार आहे. मात्र हा संपूर्ण महामार्ग खुला होण्यापूर्वीच एमएसआरडीसीने त्याच्या टोलमध्ये मोठी वाढ केली आहे.

१ एप्रिलपासून समृद्धी महामार्गावर नवे टोलदर लागू होणार आहेत. पुढील तीन वर्षांसाठी म्हणजेच ३१ मार्च २०२८ पर्यंत ते लागू राहतील असे एमएसआरडीसीने सांगितले आहे. नागपूर ते इगतपुरीपर्यंत कार हलकी वाहने यांना सध्या १०८० रुपयांचा टोल भरावा लागायचा. मात्र नव्या दरानुसार १,२९० रुपये टोल द्यावा लागेल.

समृद्धी महामार्गावर टोलसाठी किती पैसे मोजावे लागणार?

- हलकी, व्यावसायिक, मिनीबससाठी सध्या १७४५ रुपये टोल द्यावा लागतो. नवीन टोलदर २०७५ झाला आहे.

- बस किंवा दोन आसाचा ट्रकसाठी सध्या ३६५५ रूपये टोल दिला जातो. नवीन दरवाढीनुसार ३६५५ रुपये टोल भरावा लागेल.

- अति अवजड वाहनांना सध्या ६९८० रुपये टोल भरावा लागतो. नव्या दरवाढीनुसार ६९८० रुपये टोल भरावा लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, अन् १ वर्षाने आयुष कोमकरची हत्या

Shocking : संतापजनक! मुलाच्या हव्यासापोटी जन्मदात्याने मुलीला संपवलं; बिहार हादरलं

चांदीच्या पालखीतून निघाला पुण्याचा पहिला मानाचा कसबा गणपती|VIDEO

'...नाहीतर तुझे डोळे बाहेर काढेन' प्रसिद्ध कंटेट क्रिएटरच्या ब्लाऊजकडे पाहत राहिला, बस प्रवासात आजोबाचा प्रताप

SCROLL FOR NEXT