Samruddhi Expressway robbery in Sinnar 
महाराष्ट्र

समृद्धी महामार्गावर मध्यरात्री दरोडा, धावत्या कारचे टायर फोडून कुटुंबाला लुटले; सोन्या-चांदीचे दागिने लंपास

Samruddhi Expressway Robbery: समृद्धी महामार्गावर मध्यरात्री दरोडेखोरांनी धावत्या वाहनांचे टायर फोडून कुटुंबाला लुटले. सिन्नरजवळील मलढोण-दुशिंगपूर परिसरात सोन्या-चांदीचे दागिने, रोकड आणि मौल्यवान वस्तू असा तब्बल १८ लाखांचा मुद्देमाल लंपास झाला.

Namdeo Kumbhar

Samruddhi Expressway robbery in Sinnar : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सिन्नर तालुक्यात मध्यरात्री दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांना लक्ष्य केले. रस्त्यावर धारदार लोखंडी वस्तू टाकून धावत्या कारचे टायर पंचर करायचे आणि नंतर हल्ला करून लुटायचे, असा भीषण प्रकार सिन्नर जवळील मलढोण आणि दुशिंगपूर परिसरात घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्री दरोडेखोरांनी महामार्गावर जाणीवपूर्वक धारदार लोखंडी वस्तू पसरवून ठेवल्या होत्या. यामुळे मध्यरात्रीच्या सुमारास तिथून जाणाऱ्या दोन ते तीन वाहनांचे टायर अचानक फुटले. यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील एक कुटुंब कारने प्रवास करत होते. कारचे टायर पंचर झाल्याने चालकाने गाडी बाजूला थांबवली. गाडी थांबताच झुडपात दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांनी अचानक या कुटुंबावर हल्ला चढवला.

दरोडेखोरांनी शस्त्रांचा धाक दाखवून छत्रपती संभाजीनगरच्या या कुटुंबाकडील सोन्या-चांदीचे दागिने, रोकड आणि मौल्यवान वस्तू असा तब्बल १८ लाखांचा मुद्देमाल लुटून नेला. एकापाठोपाठ दोन ते तीन वाहनांचे टायर फोडून दरोडेखोरांनी या परिसरात मोठा उच्छाद मांडला होता, ज्यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या इतर वाहनधारकांमध्येही प्रचंड घबराट पसरली आहे.

या धक्कादायक घटनेनंतर पीडित कुटुंबाने तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. या दरोड्याप्रकरणी नाशिक ग्रामीणच्या वावी पोलीस ठाण्यात अज्ञात दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांनी अशी नवी युक्ती वापरून दरोडा टाकल्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून, वावी पोलिसांकडून दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी शोधमोहीम वेगाने सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नेपाळच्या दुर्घटनेत राज्यातील ६० नागरिक बेपत्ता

भाजप नेत्याला उडवण्याचा प्रयत्न, आमदाराच्या घरावर ग्रेनेड फेकले, राजकारणात खळबळ

Ganpati Puja : दुर्वा की लाल जास्वंद, गणपतीला अधिक काय प्रिय? पूजा करण्यापूर्वी घ्या जाणून

CNG Price : महिन्याच्या शेवटी सर्वसामान्यांना मोठा झटका! सीएनजीचे दर पुन्हा वाढले, पाहा सविस्तर

Saturday Horoscope: पैसा मिळणार, पण कोणत्या राशीला? वाचा आजचं राशिभविष्य

SCROLL FOR NEXT